---Advertisement---

अवघ्या चोविसाव्या वर्षी रिषभ पंतने मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा ‘हा’ विक्रम, वाचा एका क्लिकवर

On: शुक्रवार, जुलै 1, 2022 9:33 PM
Rishabh-Pant-Cuttak
---Advertisement---

रिषभ पंतने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो टीम इंडियाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. इंग्लंडविरुद्धच्या ५व्या कसोटीत (IND vs ENG) संघाने ९८ धावांत ५ विकेट गमावल्या. यानंतर पंतने रवींद्र जडेजासोबत अर्धशतकी भागीदारी करत संघाची धुरा सांभाळली. पहिल्या दिवसापर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात ५ बाद १७४ धावा केल्या आहेत. पंत ५२ चेंडूत ५३ धावा खेळत आहे. ६ चौकार आणि १ षटकार मारला. त्याचवेळी रवींद्र जडेजा ६५ चेंडूत ३२ धावा करून उभा आहे. दोघांनीही आतापर्यंत नाबाद ७६ धावा जोडल्या आहेत. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे.

याशिवाय रइफभ पंतने २४ वर्षे २७१ दिवसांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकारही पूर्ण केले आहेत. ही कामगिरी करणारा तो सर्वात तरुण भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने २५ वर्षे आणि सुरेश रैनाने २५ वर्षे ७७ दिवसांत हा पराक्रम केला होता.

दिल्लीच्या रिषभ पंतने ३१वी कसोटी खेळताना आता ४५ षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर त्याने २४ वनडेमध्ये २४ आणि ४८ टी२० मध्ये ३१ षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० षटकार मारणारा तो १४वा भारतीय आहे. रोहित शर्माने सर्वाधिक ४६४ षटकार मारले आहेत.

दरम्यान, भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी ३५२ षटकारांसह दुसऱ्या तर सचिन तेंडुलकर २६४ षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरा कोणताही भारतीय २५० षटकारांचा आकडा पार करू शकलेला नाही. युवराज सिंगने २४९ तर सौरव गांगुलीने २४६ षटकार ठोकले आहेत. शिवाय रिषभ पंतच्या कसोटी कारकिर्दीतील हे दहावे अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने ३० सामन्यांत ४१ च्या सरासरीने १९२० धावा केल्या आहेत. त्याने ४ शतके आणि ९ अर्धशतके केली आहेत. त्याने नाबाद १५९ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली आहे. गेल्या वर्षीही त्याने इंग्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

INDvENG। पॉट्सने थेट त्रिफळा उडवत केला कोहलीच्या ७१व्या शतकाच्या स्वप्नाचा चुराडा

‘तो’ प्लेअर आम्हाला कर्णधार पेक्षा खेळाडू म्हणून गरजेचा!, प्रशिक्षक राहुल द्रविडची थेट प्रतिक्रिया

INDvENG। पाचवा कसोटी सामना सुरू, वाचा काय आहे पहिल्या चार सामन्यांचा निकाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---