भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्प्टनच्या द रोज बाउल मैदानावर सुरू आहे. या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सामन्यावर आपली मजबूत पकड बनवली होती. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला (१९ जून) कर्णधार विराट कोहलीनंतर भारताला आणखी एक धक्का बसला.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतीय संघाने ३ बाद १४६ धावाांपासून केली. यावेळी विराट कोहली ४४ धावांवर फलंदाजी करत होता तर अजिंक्य रहाणे नाबाद २९ धावांवर होता. परंतु न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन याने विराटला ४४ धावांवर पायचीत करत माघारी धाडले. त्यानंतर सहाव्या क्रमकांवर रिषभ पंत फलंदाजीसाठी आला. (WTC final : Rishabh pant gone on just 4 runs)
सुरुवातीच्या काही चेंडूंमध्ये, न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांपुढे रिषभ संघर्ष करताना दिसला. परंतु त्याने खराब चेंडू मिळताच त्याचा फायदा घेत चेंडू सीमारेषेबाहेर टोलवला आणि ४ धावांची खात्यात नोंद केली. पण गोलंदाज जेमिसनने ७४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऑफ साईडच्या दिशेने चेंडू टाकला होता. जो पंतच्या बॅटचा कडा घेत दुसऱ्या स्लीपवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या टॉम लॅथमच्या हातात गेला होता आणि तो झेलबाद झाले. अशाप्रकारे तो २२ चेंडू खेळून अवघ्या ४ धावा करत माघारी परतला.
#TeamIndia in Trouble. After #ViratKohli rishabh pant gone on just 4 runs #INDvNZ #WTC2021 pic.twitter.com/b49KCnzF4c
— Ankush Dhavre (@AnkushDhavre) June 20, 2021
गिल आणि रोहितने करुन दिली चांगली सुरुवात
भारतीय संघाला रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी मिळून ६२ धावांची भागिदारी केली होती. यामध्ये रोहित शर्माने ३४ धावांचे योगदान दिले तर शुबमन गिलने २८ धावांचे योगदान दिले होते. भारतीय फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मते, साउथम्प्टनच्या खेळपट्टीवर २५० पेक्षा अधिक धावा देखील आव्हानात्मक असतील. त्यामुळे भारतीय फलंदाजांना टिचून फलंदाजी करावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या