---Advertisement---

खास बेत! विराट मैदानात वेगवान गोलंदाजांचा सामना करत होता, तर अनुष्का शर्मा घेत होती समोस्यांचा आस्वाद

On: रविवार, जून 20, 2021 4:36 PM
---Advertisement---

पाऊस असेल किंवा मस्त थंड वातावरण असेल, तर आपल्यातील अनेकांना सहज वाटून जातं की काहीतरी गरमागरम खायला असावं आणि चहा असावा, असं असेल तर त्या वातावरणाची मजाच काही और असते. अशाच वातावरणाची मजा सध्या विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा घेताना दिसत आहे.

साउथॅम्प्टनच्या थंड वातावरणात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. अशातच विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील या सामन्याचा आनंद घेताना दिसून आली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

हा रोमांचक सामना, अनुष्का शर्मा आपल्या बेडरूमच्या गॅलरी मधून पाहताना दिसून आली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनून आहेत. तिने नाणेफेक सुरू असतानाचा एक फोटो शेअर केला होता ज्यावर तिने कॅप्शन म्हणून ,”बेडरूमच्या गॅलरीतून नाणेफेक होताना पाहत आहे,” असे लिहिले होते.

तसेच ती साउथॅम्प्टनच्या थंड वातावरणात समोसा खात असताना दिसून आली आहे. तिने समोस्यांनी भरलेल्या प्लेटचा फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. ज्यावर तिने कॅप्शन म्हणून लिहिले आहे की, “कमी प्रकाशाच्या वेळी गरमा गरम समोसे बाहेर येतात.” इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहलीसह अनुष्का शर्मा आणि त्याची मुलगी वामिकाने देखील उपस्थिती दर्शविली आहे.(Anushka Sharma share photo on her instagram story enjoying samosa during WTC final match)

या सामन्यात शनिवारी दुसऱ्या सत्राच्या अखेरीसपासून कमी प्रकाशाचा व्यत्यय येत असल्याने या दिवसाचा खेळ ६५ व्या षटकादरम्यान थांबवण्यात आला होता.

Screengrab: Instagram/@anushkasharma

हवामान खात्याने दिलेल्या रिपोर्टनुसार, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी देखील पाऊस येण्याची शक्यता असणार आहे. या सामन्यातील पहिला दिवस पावसामुळे रद्द करण्यात होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील कमी प्रकाशाचा व्यत्यय आल्याने सामना थांबवण्यात आला होता. आयसीसीने या सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवला आहे.

तसेच दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर,भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाने ६४.४ षटकात ३ बाद १४६ धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली नाबाद ४४ धावांवर फलंदाजी करत आहे.तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे २९ धावांवर फलंदाजी करत आहे.

महत्वाच्या बातम्या

‘पाऊस आमचा जल्लोष काय थांबवणार’, म्हणत चाहत्यांनी गायले हिटमॅन सॉन्ग; एकदा ऐकाच

क्रिकेट रसिकांना घडले विराटच्या अप्रतिम कव्हर ड्राईव्हचे दर्शन अन् पाकिस्तानी कर्णधार झाला ट्रोल

विश्वचषक जिंकल्यास न्यूड होण्याची घोषणा करणारी अभिनेत्री चर्चेत, WTC फायनलबद्दल दिली धक्कादायक प्रतिक्रिया  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---