इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात भारताचा तिसरा सामना उद्या(13 जून) न्यूझीलंड विरुद्ध होणार आहेय. पण या सामन्याआधीच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला डाव्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
काही वृत्तांनुसार या दुखापतीमुळे त्याला 3 आठवड्यांसाठी या विश्वचषकातून बाहेर बसावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी भारतीय संघ बदली खेळाडू घेणार का याबद्दल चर्चा सुरु होत्या. त्यातच आता असेही वृत्त आले आहे की भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत भारतीय संघात शिखर धवनला पर्याय म्हणून( बॅकअप) सामील होण्यासाठी इंग्लंडला निघाला आहे.
असे असले तरी त्याला अजून अधिकृतरित्या शिखरचा बदली खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलेले नाही.
याबद्दल बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकारीने पीटीआयला सांगितले आहे की ‘रिषभ पंत संघ व्यवस्थापनाच्या विनंती नुसार पर्याय म्हणून(शिखर धवनला पर्याय म्हणून) भारतातून निघाला आहे.’
शिखर धवन जर वेळेत बरा झाला नाही तर पंतला संधी द्यावी असे मत सुनील गावसकर, केविन पीटरसन अशा दिग्गजांनी याआधीच व्यक्त केले होते.
तसेच पंतचे नाव विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड होण्याआधी एमएस धोनीला पर्याय म्हणून दुसऱ्या यष्टीरक्षकासाठी आघाडीवर होते. परंतू त्याच्याऐवजी निवडसमीतीने धोनीसह दुसरा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकची निवड केली. पण त्याचबरोबर पंत आणि अंबाती रायडूला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते.
शिखरच्या दुखापतीबद्दल माहिती देताना काल(11 जून) बीसीसीआयने ट्विट केले होते की ‘भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन सध्या बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या निरिक्षणाखाली आहे. संघ व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे की शिखर इंग्लंडमध्येच राहिल आणि त्याच्या दुखापतीची प्रगतीवरही लक्ष ठेवले जाईल.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–शिखर धवनच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयचा मोठा खूलासा
–विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले…
–विश्वचषक २०१९: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का