दक्षिण आफ्रिका आणि भारत (SAvIND) यांच्यादरम्यान केपटाऊन येथे कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची खराब सुरुवात झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली व यष्टीरक्षक रिषभ पंत (Virat Kohli and Rishabh Pant Partnership) यांनी शानदार भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. सर्व संघ सहकारी बाद होत असताना रिषभ पंतने अखेरपर्यंत नाबाद राहत एक अविस्मरणीय शतक ठोकले. यासह त्याने आपल्या नावे अनेक विक्रम जमा केले. (Rishabh Pant Capetown Century)
सातत्याने खराब कामगिरी करत असल्यामुळे टीकेचा धनी ठरत असलेल्या रिषभने या डावात आक्रमण व संयम यांचा सुरेख मेळ साधत एक संस्मरणीय खेळी केली. आधी कर्णधार विराट कोहलीसह ९४ धावांची भागीदारी व त्यानंतर तळाच्या फलंदाजांसह भारताला दुसर्या डावात सन्मानजनक धावसंख्या उभारून देत नाबाद शतकी खेळी केली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत १०० धावा करत आपल्या कारकिर्दीतील चौथे कसोटी शतक पूर्ण केले.
या शतकी खेळी दरम्यान पंत सेना (SENA) देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया) तीन शतके ठोकणारा पहिला आशियाई फलंदाज बनला. त्याने आपल्या कारकिर्दीत आत्तापर्यंत इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेत शतके केली आहेत. यासोबतच ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याच्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये शतके काढणारा तो केवळ दुसरा यष्टीरक्षक आहे.
यासोबतच रिषभने आपल्या भारताबाहेरील अवघ्या २२ व्या सामन्यात तिसरे शतक केले. भारतासाठी आतापर्यंत विविध देशांत यष्टीरक्षण केलेल्या इतर सर्व यष्टिरक्षकांनी २०४ सामन्यांमध्ये मिळून ३ कसोटी शतके केली आहेत.
भारतीय संघ सामन्यात आघाडीवर
पहिल्या डावात नाममात्र आघाडी मिळाल्यानंतर भारताने दुसर्या डावात केएल राहुल, मयंक अगरवाल, अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा हे पहिले चार गडी केवळ ५८ धावांमध्ये गमावले. मात्र, त्यानंतर कर्णधार विराट कोहली पंतने ९४ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. पंतने नाबाद शतकी खेळी केली. भारतीय संघ १९८ धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी २१२ धावा कराव्या लागतील.
महत्त्वाच्या बातम्या-
सिडनीचा ‘सुपरहिरो’ ख्वाजाच्या खांद्यावर पाचव्या कसोटीसाठी नवी जबाबदारी (mahasports.in)






