आयपीएल 2024 मध्ये आज शनिवारी 23 मार्च रोजी हंगामातील पहिल्या डबल हेडरचं आयोजन करण्यात आले आहे. तर या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आले आहेत. तर डबल हेडरमधील दुसरा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तसेच पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा परिस्थितीत ऋषभ पंतचा संघ पहिल्यांदा फलंदाजी करताना दिसणार आहे. तर अपघातानंतर परतलेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत नाणेफेकीदरम्यान भावूक झालेला पहायला मिळाले आहे. याबरोबरच ऋषभ पंत अपघातानंतर तब्बल 453 दिवसांनी कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.
यानंतर नाणेफेक दरम्यान पंत म्हणाला की, “चिंता आहे तसेच उत्सूकही आहे, खूप काय काय वाटतंय. त्यामुळे फार विचार करण्याची गरज नाही. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करा. धोनी भाईचा एक डायलॉग आहे. पडत्या विषयावर लक्ष द्या, हा एक प्रवासाचा भाग आहे. त्या प्रवासाचाही आनंद घ्यायचाय. सराव करताय तर बॅट कशी आहे? विकेटकीपींग करताय तर बॉल हातात कसा येतोय? या लहान लहान गोष्टींचा आनंद घेतला तर जीवनात सकरात्मकता वाढेल.”
पुढे बोलताना पंत म्हणाला आहे की, “वॉकिंगपासून जॉगिंगला सुरुवात केली. जॉगिंगनंतर रनिंगला केली. त्यानंतर बॅटिंग केली. तो नेमका दिवस मला लक्षात नाही, मात्र तो क्षण मला लक्षात आहे. ती भावना तुम्ही शब्दात मांडू शकत नाही. तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाता. असंही वाटलं नाही की पहिल्यांदा खेळलोय किंवा असंही वाटलं नाही आधीपासून खेळतोय. ती वेगळीच ताकद आणि वेगळीच भावना होती.”
🚨 Toss Update 🚨@PunjabKingsIPL elect to bowl against @DelhiCapitals
Follow the Match ▶️ https://t.co/ZhjY0W03bC#TATAIPL | #PBKSvDC pic.twitter.com/PeCNo8I1V8
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
दरम्यान, ऋषभ पंतने आयपीएलमधील अखेरचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध 15 व्या हंगामात 21 मे 2022 रोजी खेळला होता. तर अखेरचा क्रिेकट सामना हा 22 डिसेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध खेळला होता. त्यानंतर पंतचा अपघात झाला. पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पंत अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर सरावाला सुरुवात केली आणि अखेर तो आता सज्ज झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-