भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने ०-२ अशी विजयी आघाडी घेतली असून बुधवारी (२७ जुलै) संघाला मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळायचा आहे. तत्पूर्वी मंगळवारी (२६ जुलै) भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला. पंतने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, युझवेंद्र चहल अशा खेळाडूंसोबत लाईव्ह केले होते. यादरम्यान चाहत्यांना माजी कर्णधार एमएस धोनीचेही दर्शन झाले.
रिषभ पंत (Rishabh Pant), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि युझवेंद्र चहल यांनी इंस्टाग्रामवर लाईव्हची चांगलीच जमा घेतला. यादरम्यान त्यांनी काही चाहत्यांना देखील लाईव्हमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. पंतने केलेल्या या लाईव्हमध्ये एमएस धोनीची पत्नी साक्षीही सहभागी झाली होती. लाईव्हमध्ये जोडले गेल्यानंतर साक्षी सर्वांना हॅलो म्हणाली आणि फोन धोनीकडे केला. एमएस धोनी (MS Dhoni) देखील चाहत्यांकडे पाहून हॅलो बोलताना दिसला, पण त्याने तितक्यात साक्षीच्या हातातून फोन काढून घेतला.
Cross talks 🗣️ with Thala and Co!😁🤩#ThalaDharisanam 🦁💛 https://t.co/MYE5JPbZJq pic.twitter.com/52ubV56BT8
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 26, 2022
साक्षीने फोन धोनीकडे केल्यानंतर रिषभ तिला म्हणतो की, “माही भाई, कसा आहेस. भैयाला थोडा वेळ लाईव्हवर ठेवा.” पंतचे हे बोलणे ऐकताच धोनीने साक्षीच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि लाईव्ह बंद केले. दरम्यान इंस्टाग्राम लाईव्हचा हा व्हिडिओ सध्या इतर सोशल मीडिया माध्यमांवर देखील व्हायरल होत आहे. धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने देखील त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, ही पहिलीच वेळ असू शकते, जेव्हा धोनी एखाद्या इंस्टा लाईव्हमध्ये दिसला आहे. धोनी सोशल मीडिया जरी वापरत असला, तरी तो या माध्यमांवर जास्त सक्रिय दिसत नाही.
या लाईव्हमध्ये चाहत्यांना धोनीच जरी एक झलक दिसत असली, तरी त्याचे नाव ट्वीटवर ट्रेंड करू लागले आहे. दरम्यान, हे लाईव्ह करणारा रिषभ पंत वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी नाहीये, तसेच नियमित कर्णधार रोहित शर्माही एकदिवसीय मालिकेत संघाचा भाग नाही. परंतु वेस्ट इंडीजविरुद्ध २९ जुलैपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत मात्र दे दोघेही संघात पुनरागमन करतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहितनंतर बुमराह सांभाळेल कसोटी संघाची धुरा, तर वनडे संघाच्या कॅप्टन्सीसाठी ‘हे’ दोघे दावेदार
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, इंडियाकडे आयसीसीच्या ‘या’ स्पर्धेचे यजमानपद
मोठी बातमी: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबाबत आयसीसीची महत्त्वाची घोषणा