---Advertisement---

या कारणामुळे रिषभ पंत मेगा लिलावात उतरला, मुख्य प्रशिक्षकांचा खळबळजनक खुलासा!

On: रविवार, डिसेंबर 8, 2024 6:39 PM
rishabh pant comeback
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचे नवे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी संघाचा माजी कर्णधार रिषभ पंतबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. बदानी यांनी रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडून मेगा ऑक्शनमध्ये का उतरला यामागचं कारण सांगितलं. एवढे दिवस पंतचं दिल्लीपासून वेगळं होण्यामागचं कारण पैसै नाही असं बोललं जात होतं. मात्र आता या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे.

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात रिषभ पंतला लखनऊ सुपर जायंट्सनं विक्रमी 27 कोटी रुपयांच्या किमतीत खरेदी केलं. यासह तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दिल्लीनं शेवटपर्यंत पंतला खरेदी करण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र शेवटी मोठी बोली लागल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.

हेमांग बदानी यांनी सांगितलं की, पंतला आयपीएल 2025 साठी रिटेन व्हायचं नव्हतं, कारण त्याला वाटत होतं की त्याची किंमत 18 कोटींपेक्षा जास्त आहे. माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथ याच्या यूट्यूब चॅनलवर झालेल्या संवादादरम्यान बदानी यांनी हा खुलासा केला. बदानी यांनी सांगितलं की, “पंतनं फ्रेंचायझीला सांगितलं की त्याला लिलावात उतरून त्याची खरी किंमत जाणून घ्यायची आहे. तो पहिल्या रिटेन्शन पेक्षा जास्त पैशांची मागणी करत होता. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही त्याला अनेक वेळा कॉल आणि मेसेज केले, परंतु तो अधिक पैसे मिळविण्यासाठी लिलावात जाण्यास उत्सुक होता.”

येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, लिलावानंतर दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पर्थ जिंदाल यांनी फ्रँचायझी आणि पंत यांच्यात कोणताही मतभेद नसल्याचं सांगितलं होतं. पंतला लिलावात जायचं होतं आणि आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर केला, असं ते म्हणाले.

पंतनं 2016 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून आपल्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली होती. तो 2024 पर्यंत फ्रँचायझीचा प्रमुख भाग राहिला. तो संघाचा कर्णधारही होता. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स आपलं पहिलं आयपीएल विजेतेपद पटकावू शकली नाही.

हेही वाचा – 

बांगलादेशने अंडर 19 आशिया चषक जिंकला, फायनलमध्ये भारताचा एकतर्फी पराभव!
ॲडलेडमध्ये इतिहास घडला! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना फक्त इतक्या चेंडूत संपला!
ॲडलेडमध्ये सर्वच फेल! या 3 खेळाडूंमुळे झाला भारताचा पराभव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---