भारताचा बांगलादेेश दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्याचा शेवट भारतासाठी चांगला राहिला. भारताने बांगलादेशला 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला. यानंतर भारतीय संघ आता श्रीलंकेचा सामना करणार आहे. 3 जानेवारीपासून श्रीलंकेेचा संघ भारताविरुद्ध टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. मात्र, घोषणा झालेल्या या संघामध्ये यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याचा समावेश नाही. पंतने बांगलादेेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 93 धावांची झुंजार खेळी केली होती. अशातच त्याचे नाव स्क्वॉडमध्ये नसल्याने चाहते हैराण झाले. असे मानले जात आहे की, त्याच्या एकदिवसीय आणि टी20 सामन्यांमधील खराब प्रदर्शनामुळे संघाबाहेर केले गेले. मात्र, याबाबत अधिकाारिक घोषणा अद्याप झाली नाही.
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात ईशान किशन (Ishan Kishan) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) आणि एकदिवसीय मालिकेत केएल राहुल (KL Rahul) आणि ईशान किशन यांची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र, रिषभ पंत (Rishabh Pant) याला संघाबाहेर काढल्यानेे वेगवेगळे अनुमान काढले जात आहे,पण काही माध्यंमाच्या अहवालानुसार कारण काहीतरी वेेगळेच आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, पंत दुखापतग्रस्त झाला आहे. तो गुडघ्याला झालेेल्या दुखापतीमुळे त्रस्त आहेे आणि त्याला नॅशनल क्रिकेट ऍकेेडमी येथे जाण्यास सांगितलेे आहे. तो 2 आठवड्यांसाठी पुनर्वसणासाठी एनएसमध्ये जाणार आहे. मात्र, बीसीसीआयकडून याबाबत कोणतीही अधिकारिक घोषणा झालेली नाही.
पंतने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात 2017मध्ये केली होती. त्याने आतापर्यंत 33 कसोटी, 30 एकदिवसीय आणि 66 टी20 सामने खेळले, ज्यात त्याने अनुक्रमे 2271, 865 आणि 987 धावा केल्या. पंतने क्रिकेटच्या सर्वात मोठ्या प्रकारात आपला ठसा उमटवला आहे. कसोटी सामन्यात त्याची सरासरी 43.67 , एकदिवसीयमध्ये 34.60 आणि टी20 सामन्यात 22.43 इतकी आहे. पंतने कसोटीमध्ये 5 शतके आणि 11 अर्धशतके झळकावले आहेत. एकदिवसीय प्रकारात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके लगावली. पंतने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये फक्त 3 अर्धशतके केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजासाठी वर्षाचा शेवट आंबट-गोड! आयपीएल लिलावामध्ये कमावले कोटी, आता दुखापतीमुळे…
बांगलादेश दौऱ्यावरुन परतताना भारतीय खेळाडूचे हरवले सामान, एअरलाईन्सकडेे मागितला जाब