सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 147 धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) फ्लाॅप ठरले. यावेळी भारतीय संघ अडचणीत असताना स्टार फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pan) शानदार अर्धशतक झळकावले आहे.
रिषभ पंतने (Rishabh Pant) 50 चेंडूत 53 धावा ठोकल्या आहेत. दरम्यान त्याने 7 चौकारांसह 1 षटकार ठोकला. आता भारतीय संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 55 धावांची गरज आहे. पंत 53 धावांसह तर वाॅशिंग्टन सुंदर (Washington Sundar) 6 धावांसह नाबाद आहे.
लंचब्रेकनंतर दोन्ही संघातील ही रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. भारतीय संघ 55 धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीमध्ये सलामीला येणार ‘हे’ स्टार खेळाडू! दिग्गजाचे मोठे वक्तव्य
भारतीय संघ फलंदाजी करणं विसरला, घरच्या मैदानावर क्लीन स्वीपची नामुष्की!
कसोटीत टी20 खेळतोय हिटमॅन, पिचवर अर्धा तासही थांबेना! किंग कोहलीकडून ही निराशा..