भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस रिषभ पंतच्या नावावर झाला. या दिवशी भारताकडून पहिल्या डावात पंतने शतक झळकावले. हे शतक त्याच्या कारकिर्दीतील केवळ तिसरे शतक आहे. या शतकासोबतच पंतने दिग्गज यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर गिलख्रिस्टने ट्विटरद्वारे पंतचे कौतुक केले. आता पंतने आपले कौतुक केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज गिलख्रिस्ट यांनी लिहिले होते की, ‘तू किती गोष्टी साध्य करतोस हे जास्त महत्त्वाचे नाही; तर तू कोणत्या वेळी या गोष्टी साध्य करतोस हे महत्त्वाचे आहे. आपल्या संघाला जेव्हा जास्त गरज असते, तेव्हा तुम्ही तुमचे उत्कृष्ट देत असाल तरच तुम्ही खऱ्या अर्थाने मॅच विनर असता.’
गिलख्रिस्टच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतने म्हटले की, ‘तुम्ही माझ्याबद्दल असे म्हणणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मागील काही वर्षात तुम्हाला पाहून मी खूप काही शिकलो आहे.’
Huge compliment coming from you, Gilly! Learned a lot watching you over the years. https://t.co/H5XIQl3XMe
— Rishabh Pant (@RishabhPant17) March 5, 2021
रिषभने ठोकले तिसरे शतक
अहमदाबाद कसोटीच्या दुसऱ्या दिवशी, पंतने आपल्या कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने ११८ चेंडूंचा सामना करताना १०१ धावांची आक्रमक खेळी केली. ज्यामध्ये १३ चौकार व २ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याचे हे मायदेशातील पहिलेच शतक आहे. रिषभने आपली पहिली दोन कसोटी शतके भारताबाहेर म्हणजे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ठोकली होती.
गिलख्रिस्टच्या कामगिरीची केली बरोबरी
पंतने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात षटकार खेचत शतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतात कसोटी शतके ठोकण्याची कामगिरी करून दाखवली. यापूर्वी, यष्टीरक्षक म्हणून या तीन देशात शतके झळकावण्याची कामगिरी केवळ ऑस्ट्रेलियाचे माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्टने केली होती. त्यानंतर, पंतने हा खास कारनामा करून दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsENG 4th Test Live: चौथ्या कसोटीच्या तिसरा दिवसाचा खेळ सुरू, वॉशिंग्टन-अक्षरची जोडी मैदानात
कोहली, सिराजशी झालेल्या शाब्दिक वादाबद्दल बेन स्टोक्सने मांडली बाजू, म्हणाला…
रिषभच्या लक्षणीय खेळीने हिटमॅनला पाडली भुरळ; म्हणाला, “पंत धोनीची जागा घेण्यास पूर्णपणे सज्ज”