भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतनं न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत धमाकेदार फलंदाजी केली. तो किवी संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय ठरला. मात्र या कसोटीत त्यानं हा एकमेव पराक्रम केला नाही. त्यानं या सामन्यात एक असा रेकॉर्ड बनवला, जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत कोणीही करू शकलेला नाही!
न्यूझीलंडविरुद्ध रिषभ पंतनं कसोटी कारकिर्दीतील 13वं अर्धशतक झळकावलं. त्यानं 36 चेंडूत 50 धावांचा टप्पा गाठला. न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही भारतीयाचं हे सर्वात जलद अर्धशतक आहे. या यादीत पंतशिवाय यशस्वी जयस्वाल, हरभजन सिंग आणि सरफराज खान यांचा समावेश आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे भारतीय
रिषभ पंत – 36 चेंडू
यशस्वी जयस्वाल – 41 चेंडू
हरभजन सिंग – 42 चेंडू
सरफराज खान – 42 चेंडू
विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रमही रिषभ पंतच्या नावावर आहे. त्यानं 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 28 चेंडूत 50 धावा ठोकल्या होत्या.
या सामन्यात रिषभ पंतनं आणखी एक विक्रम केला जो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत कोणीही करू शकलेलं नाही. आपल्या या खेळीत पंतनं 2 षटकार ठोकले. यासह त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये 66 षटकार झाले आहेत. हे त्याच्या कसोटीतील 65 डावांपेक्षा जास्त आहे. रिषभ पंतनं आतापर्यंत 38 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याला 65 वेळा फलंदाजीची संधी मिळाली. कमीत कमी 50 डाव खेळलेल्या फलंदाजांच्या यादीत तो एकमेव फलंदाज आहे, ज्यांचे षटकार त्यांच्या डावापेक्षा जास्त आहेत.
पंत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात 59 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 60 धावा करून बाद झाला. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक वेळा 100 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटनं 50 धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला. त्यानं या बाबतीत दिग्गज महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला. आता जागतिक क्रिकेटमध्ये आता फक्त ॲडम गिलख्रिस्ट पंतच्या पुढे आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये 100+ स्ट्राईक रेटनं सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारे यष्टीरक्षक
ॲडम गिलख्रिस्ट – 8
रिषभ पंत – 5
एसएस धोनी – 4
जॉनी बेअरस्टो – 4
सरफराज अहमद – 4
क्विंटन डी कॉक – 3
एन डिकवेला – 3
मॅट प्रायर – 3
हेही वाचा –
भारताच्या 38 वर्षीय खेळाडूवर सीएसकेची नजर, मेगा लिलावात लावू शकतात मोठी बोली
रिषभ पंतचं मुंबईत विक्रमी अर्धशतक, न्यूझीलंडविरुद्ध केला मोठा पराक्रम
धक्कादायक! पाकिस्ताननंतर युएईकडून देखील भारताचा पराभव