भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दरम्यान दोन्ही संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली जात आहे. तत्पूर्वी ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना स्टार खेळाडू ‘रिषभ पंत’कडून (Rishabh Pant) मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्याने पहिल्या 3 कसोटी सामन्यांत चाहत्यांना निराश केले. त्याने या मालिकेतील 5 डावात केवळ 96 धावा केल्या आहेत.
त्याचवेळी, आता पंतला आयसीसी कसोटी क्रमवारीत याचा फटका बसला आहे. वास्तविक पंत टॉप-10 फलंदाजांच्या यादीतून बाहेर पडला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरू होण्यापूर्वी रिषभ पंत सहाव्या स्थानावर होता, मात्र आता तो 11व्या स्थानावर घसरला आहे.
आता फक्त युवा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) हा आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय फलंदाज आहे. या मालिकेची सुरूवात जयस्वालने धमाकेदारपणे केली होती. त्याने पहिल्या कसोटीत शतक झळकावून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती, मात्र त्यानंतर तो फ्लॉप ठरत आहे. पर्थ कसोटीनंतर त्याने अनुक्रमे 45, 0, 24, 4, 4 धावा केल्या आहेत. मात्र, या फ्लॉप शोनंतरही तो 805 रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत पाचव्या स्थानी कायम आहे.
इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूट (Joe Root) सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत शीर्ष स्थानी आहे. त्याचे 895 रेटिंग गुण आहेत. यानंतर हॅरी ब्रूक (Harry Brook) 876 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. केन विल्यमसन (Kane Williamson) 867 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. ट्रॅव्हिस हेड (Travis Head) चौथ्या स्थानी आहे. त्याचे 825 रेटिंग गुण आहेत. यशस्वी जयस्वाल 805 रेटिंग गुणांसह पाचव्या स्थानी आहे. कामेंदू मेंडिस, टेम्बा बवुमा, डॅरिल मिचेल, सौद शकील, स्टीव्ह स्मिथ हे अनुक्रमे टॉप-10 मध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; ऑस्ट्रेलियासाठी मेलबर्न कसोटीत पदार्पण करणारा सॅम काॅन्स्टास कोण आहे?
जसप्रीत बुमराहचा कसोटीत मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा केवळ दुसराच भारतीय
अक्षर पटेलचा मुलगा ‘हक्ष’ या नावाचा अर्थ काय? हिंदू पुराणांशी आहे खास संबंध