---Advertisement---

फायटर रिषभ! जीवघेण्या अपघातातून वेगाने सावरतोय पंत, एकट्याने चढला जिना, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, जून 14, 2023 5:09 PM
Rishabh Pant
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मागच्या काही महिन्यांपासून संघातून बाहेर आहे. 2022च्या शेवटच्या आठवड्यात पंतचा कार अपघात झाला, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटपटूला गंभीर दुखापत झाली होती. पण, पंत या दुखापतीतून अपेक्षेपेक्षा वेगाने सावरत आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पंतमध्ये होत असलेली सुधारणा स्पष्टपणे दिसून येते.

रिषभ पंत (Rishabh Pant) याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. यात चाहते स्पष्टपणे पाहू शकतात की, काही दिवसांपूर्वी आणि आता पंतमध्ये किती सुधारणा झाली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला पंतला पायऱ्या चढताना त्रास होत असल्याचे दिसते. पण व्हिडिओच्या दुसऱ्या भागात मात्र, तो आधीपेक्षा चांगल्या पद्धतीने पायऱ्या सर करताना दिसत आहे. पंतने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “कधी कधी सोप्या गोष्टीही कठीण होऊन बसतात.” चाहते पंतचा हा व्हिडिओ पाहून खूपच खुश आहेत. व्हिडिओवह लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/Ctd5Hzqo9a3/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==

दरम्यान, डिसेंबर 2022चा शेवटच्या आठवडा भारतीय क्रिकेटसाठी खूपच वाईट ठरला. 30 डिसेंबर रोजी रिषभ पंत दिल्लीवरून आपल्या घरी रुडकीला चालला होता. पहाटेच्या वेळी पंत स्वतः गाडी चालवत घरी निघाला होता. माहितीनुसार तो आपल्या आईला नवीन वर्षाची भेट म्हणून भेटण्यासाठी निघाला होता. पण वाटेतच त्याचा अपघात झाला. अपघातात पंतची गाडी जळून खाक झाली. पण सुदैवाने गाडी पेट घेण्याआधीच पंत त्यातून बाहेर पडला होता.

पंतची या अपघातात झालेली दुखापत गंभीर असून पुढचे काही महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाहीये. आगामी वनडे विश्वचषकात देखील भारतीय संघाला पंतची सेवा मिळणार नाहीये. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बीसीसीआय आयसीसी वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. मात्र, पंत या विश्वचषकात नसल्यामुळे त्याच्या जागी संघाला योग्य पर्याय शोधावा लागेल. नुकत्याच पार पडलेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात देखील संघाला पंतची कमी जाणवली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजी आक्रमाणापुढे भारताचे फलंदाज एकापाठोपाठ एक विकेट गमावते गेले आणि परिणामी सामना देखील गमावली. (Rishabh Pant has started climbing the stairs alone)

महत्वाच्या बातम्या –
मैदानावर न उतरताही अश्विन-पंतने राखली टीम इंडियाची लाज! वाचा नक्की काय घडलं
सीएसकेच्या खेळाडूचा बीसीसीआयवर गंभीर आरोप, ‘2019 वर्ल्डकपला मला…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---