---Advertisement---

या गोष्टीमुळे राहुल द्रविड झाला आनंदीत

On: रविवार, जुलै 22, 2018 12:31 PM
---Advertisement---

भारत  विरुद्ध इंंग्लंड यांच्यात होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बुधवारी (18 जुलै) भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

यामध्ये पहिल्या तीन सामन्यांसाठी १८ सदस्यीय भारतीय संघात आक्रमक युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेत २० वर्षीय ऋषभ पंतला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.

ऋषभ पंतच्या या निवडीबद्दल भारतीय अ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने आनंद व्यक्त केला.

“ऋषभने दाखवून दिले आहे की तो परिस्थितीनुसार फलंदाजी करु शकतो. त्याच्याकडे वेगवेगळ्या  प्रकारे फलंदाजी करण्याचा स्वभाव आणि कौशल्य आहे. ऋषभला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले याचा मला आनंद झाला आहे.” असे भारतीय अ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला.

भारतीय अ संघाच्या नकतेच पार पडलेल्या इंग्लंड लायन्स आणि वेस्ट इंडिज अ विरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंतने चांगली कामगिरी केली आहे.

२०१७-१८ च्या रणजी मोसमात पंतने ९०० पेक्षा अधिक धावा करत आपण कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज आहोत हे दाखवून दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुथय्या मुरलीधरनने आजच्याच दिवशी २०१० साली, क्रिकेटमध्ये घडवला होता इतिहास

-आयसीसी कसोटी क्रमवारी: टीम इंडियाचे अव्वल स्थान कायम राहणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment