भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान साउथम्प्टनमध्ये खेळला जाणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी ३ दिवसीय इंट्रास्क्वॉड सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. याबरोबरच खेळाडू नेट्समध्ये कसून घाम गाळताना दिसत आहेत. अशातच बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हे दोघेही फलंदाज तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहेत.
डाव्या हाताच्या या युवा फलंदाजाने इंट्रास्क्वॉड सराव सामन्यात तुफानी शतक झळकावले होते. तसेच या व्हिडिओमध्ये तो भल्याभल्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणणाऱ्या फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी करताना दिसून येत आहे. जडेजाने त्याला फ्लाईट चेंडू टाकला होता, ज्यावर पंतने डीप मिड विकेटच्या वरून गगनचुंबी षटकार लगावला आहे.
यासोबतच तो मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांच्या वेगवान चेंडूंचा यशस्वीरीत्या बचाव करताना दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर अनुभवी गोलंदाज ईशांत शर्मा त्याला सराव करत असताना काही खास टिप्सदेखील देताना दिसून येत आहे. (Rishabh pant hitting Six on Ravindra Jadeja ball, video went viral on social media)
Three sleeps away from the BIG GAME. 👍👍
How excited are you? 🙌 🙌#WTC21 #TeamIndia pic.twitter.com/nqaI6cf33H
— BCCI (@BCCI) June 15, 2021
पंतने गोलंदाज विरुद्ध फलंदाज अशा इंट्रास्क्वॉड सराव सामन्यात तुफानी खेळी करत ९४ चेंडूंमध्ये नाबाद १२१ धावांची खेळी केली होती. पंतव्यतिरिक्त कर्णधार विराट कोहलीने देखील नेट्समध्ये तुफानी फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, विराट बाउन्सर चेंडूंचा सराव करण्यात व्यस्त आहे. तसेच भारतीय संघाचा उपकर्णधार,अजिंक्य रहाणेने देखील नेट्समध्ये भरपूर वेळ घालवला. अजिंक्य रहाणेने ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांच्या गोलंदाजीचा सामना केला.
विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गील, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
‘हे काय घातलंस, तू भारतीय क्रिकेटपटू आहेस,’ द्रविडने एका टी-शर्टवरुन घेतली होती रैनाची शाळा
भारतीय संघाचा धुव्वा उडवण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह न्यूझीलंड संघ उतरणार मैदानावर!
भारीच! रबाडाचा विजेहून अधिक वेगवान चेंडू, फलंदाजाला काही कळायच्या आतच उडाले स्टंप्स