इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये यावर्षी १० संघ खेळत असून लीगची सुरुवात शानदार झाली आहे. लीगचा १५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर गुरुवारी (७ एप्रिल) खेळला गेला. हा सामना लखनऊने ६ विकेट्सने जिंकला. सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक अजित आगरकर यांनी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याचे (Rishabh Pant) कौतुक केले आहे.
अजित आगरकर म्हणाले की, “पंत सामना चांगल्या पद्धतीने समजून घेतो, ज्यामुळे तुम्ही खेळ विकसित करण्याच्या पद्धती आणि युवा खेळाडू म्हणून केलेल्या अनेक प्रगती पाहू शकता. एका युवा खेळाडूच्या रुपात त्याने कमी काळात जी प्रगती केली आहे, ती त्याला चांगला कर्णधार बनवतो.”
दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक शेन वाॅटसन म्हणाला, “रिषभ पंत ज्या पद्धतीने पुढे जात आहे, खेळाची स्थिती कशी ही असली तरी तो खेळ समजून घेऊन खेळतो. हा त्यावेळचा सर्वात रोमांचक भाग असतो.”
१९ वर्षाखालील विश्वचषकाचा विजेता कर्णधार यश धूल म्हणाला, “सर्वात महत्त्वाचं रिषभ पंत खूप शांत आहे आणि तो खेळ चांगल्या पद्धतीने समजतो. तो आपल्या खेळाच्या सर्व क्षणांमध्ये आपल्या शाॅटची निवड करु शकतो.”
रिषभ पंतने आपल्या आयपीए कारकिर्दीत ८७ सामन्यांत ३५. ३६ च्या सरासरीने २५८१ धावा केल्या आहेत, यामध्ये एका शतकाचा आणि १५ अर्धशतकांचा समावेश आहे. रिषभ पंत कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी करत आहे, पहिल्या सामन्यात लखनऊला गुजरातने ५ विकेट्सने पराभूत केले. त्यानंतर लखनऊने सीएसकेला ६ विकेट्सने पराभूत केले. तिसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला संघाने १२ धावांनी पराभूत केले आणि गुरुवारी झालेल्या सामन्यात लखनऊने दिल्लीला ६ विकेट्सने पराभूत केले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन राहुल सलग तिसऱ्या विजयानंतर म्हणतोय, लखनऊ संघाला ‘ही’ गोष्ट सुधारण्याची गरज
टी२०त १० हजार धावा करणाऱ्या फलंदाजाची युवा बिश्नोईपुढे शरणागती, ६ चेंडूत ३ वेळा दिलीय विकेट
दिल्लीच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर फलंदाजांवर भडकला रिषभ पंत; म्हणाला, ‘फलंदाजीत आम्ही…’