---Advertisement---

बेबीसिटर पंत! नॅथन लायनला भेट दिलेल्या जर्सीवर रिषभची स्वाक्षरी पाहून चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया 

On: शुक्रवार, जानेवारी 29, 2021 11:45 AM
---Advertisement---

मागील आठवड्यात भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला. हा ऑस्ट्रेलिया दौरा अनेक अर्थांनी भारतीय संघासाठी अविस्मरणीय ठरला. या दौऱ्यादरम्यान ब्रिस्बेन येथे कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणेने खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनला भारतीय खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी भेट दिली होती. याबद्दल गुरुवारी(२८ जानेवारी) लायनने जर्सीचा फोटो शेअर करत भारतीय संघाचे आभार मानले होते.

पण आता या जर्सीवर अनोखी स्वाक्षरी केल्याने भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मोठ्याप्रमाणात ट्रोल होत आहे. रिषभने त्याची स्वाक्षरी करताना पुढे एक हसणारा चेहरा काढला आहे. त्यामुळे रिषभच्या स्वाक्षरीवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काही चाहत्यांनी म्हटले आहे की रिषभला तो बेबीसिटर (लहान मुलांना सांभाळणारा) आहे, हे त्याच्या स्वाक्षरीतून सांगायचे आहे. तर काहींनी म्हटले आहे की यातून रिषभला काही गुपित संदेश द्यायचा आहे का?

भारताच्या २०१८-१९ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेनने रिषभ पंतला स्लेजिंग करताना बेबीसिटींग करणार का असे विचारले होते, तेव्हापासून पंतला ‘बेबीसिटर’ असे अनेकदा संबोधले जाते.

https://twitter.com/ICC/status/1354495224182140934

https://twitter.com/dhirajkateja/status/1355025092804186115

https://twitter.com/trushik28/status/1354495816744878086

https://twitter.com/nboal/status/1354645557277388801

https://twitter.com/CharlieJoe4/status/1354498865605574656

https://twitter.com/TanishaManchan2/status/1354495403366834177

https://twitter.com/saurabheklaghar/status/1354704876727627778

https://twitter.com/Nikhil_S_007/status/1354822077648257032

https://twitter.com/JishaLaha/status/1354730991298859008

लायनने इंस्टाग्रामवर पोस्ट करताना भारतीय संघाचे आभार मानले होते, त्याने म्हटले होते की ‘अजिंक्य रहाणे आणि भारतीय संघाचे मालिका जिंकल्याबद्दल अभिनंदन. तसेच तुम्ही दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल आणि मला भेट दिलेल्या भारतीय संघाच्या टी-शर्टबद्दल आभार. माझ्या संग्रहातील ही विशेष गोष्ट असेल.’

https://www.instagram.com/p/CKh6OyeDmhX/

रिषभ पंतची ऑस्ट्रेलियात शानदार कामगिरी –

रिषभला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. मात्र त्याला कसोटी संघात जागा मिळाली होती. त्याने या दौऱ्यात ३ कसोटी सामन्यात खेळताना ६८.५० च्या सरासरीने २७४ धावा केल्या होत्या. यात त्याने सिडनी कसोटीत केलेल्या ९७ धावांच्या आणि ब्रिस्बेन येथे द गॅबा स्टेडियमवर केलल्या नाबाद ८९ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. त्याच्या या दोन खेळी भारतीय संघाला मालिका जिंकून देण्यात मोलाच्या ठरल्या होत्या. तसेच तो या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाजही ठरला.

महत्त्वाच्या बातम्या –

तयारी जोमात! भारत विरुद्ध इंग्लंड संघातील चेन्नई कसोटींसाठी २ नव्या पंचांची नियुक्ती

ऑस्ट्रेलियामधील वर्णभेदाच्या घटनेतून धडा घेत इंग्लंडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

आजच्या दिवशी तब्बल २७ वर्षांपुर्वी भारताने केली होती इंग्लंडवर मात, अझरुद्दीन ठरले होते विजयाचे नायक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---