---Advertisement---

कुलदीप यादवला मिळाला नवा ‘धोनी’, यष्टीमागून करतोय मदत; जाणून घ्या कोण आहे तो?

On: सोमवार, एप्रिल 11, 2022 7:58 PM
MS-Dhoni-Kuldeep-yadav
---Advertisement---

भारताचा फिरकीपटू आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो आयपीएल २०२२ मध्ये आपल्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा ठसा उमटवत आहे. रविवारी (१० एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने शानदार गोलंदाजी केली आणि सामनावीर पुरस्कार पटकावला. त्यानंतर त्याने दिल्ली संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक रिषभ पंत याच्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

कुलदीपने (Kuldeep Yadav) या सामन्यात कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर, सुनिल नारायण, उमेश यादव आणि पॅट कमिन्स यांच्या विकेट्स घेतल्या. ४ षटके गोलंदाजी करताना केवळ ३५ धावा देत त्याने ही कामगिरी केली. अशाप्रकारे संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कुलदीपने सामना विजयानंतर प्रतिक्रिया देताना पंत (Rishabh Pant) त्याला यष्टीमागून विकेट घेण्यासाठी मदत करत असल्याचे त्याने सांगितले.

कुलदीप यादवला मिळाला नवा धोनी!
कुलदीप म्हणाला की, “मी दिल्ली संघातील वातावरणाचा आनंद लुटत आहे. मला माझ्या संपूर्ण संघाकडून समर्थन मिळत आहे. रिषभ पंत मला यष्टीमागून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतो.” 

यापूर्वी कुलदीप भारतीय संघाकडून खेळत असताना माजी कर्णधार एमएस धोनीही (MS Dhoni) त्याला अशाप्रकारेच यष्टीमागून मार्गदर्शन करत असे. धोनीच्या काळात कुलदीप आणि युझवेंद्र चहल यांची जोडी खूप प्रसिद्ध होती. या जोडीने धोनीच्या मदतीने क्रिकेटविश्वात इतका धुमाकूळ घातला होता की, सर्वांच्या तोंडात त्यांचे नाव असायचे. ही जोडी क्रिकेटविश्वात कुलचा नावाने प्रसिद्ध आहे. परंतु धोनीने संघाचे नेतृत्त्वपद सोडल्यानंतर या दोन्ही गोलंदाजांना भारतीय संघात जागा मिळणे अवघड झाले आहे.

https://twitter.com/IPL/status/1513367669835124736?s=20&t=4SHEJ7JyWNjPHH6nnWFxew

कर्णधार पंतचा कुलदीपचा पुरेपूर पाठिंबा
असे असले तरीही, आता कुलदीप आयपीएलद्वारे पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. मागील काही हंगाम खेळण्याची पुरेशी संधी न मिळाल्यानंतर आता तो दिल्ली संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्याबद्दल दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत म्हणाला की, कुलदीप गेल्या १ वर्षापासून त्याच्या खेळावर काम करत आहे. परंतु त्याला पुरेशा संधी मिळत नव्हत्या. मात्र आम्ही त्याला शक्य तितका पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतोय आणि तोही चांगले प्रदर्शन करतोय.

महत्त्वाच्या बातम्या-

केकेआरला सपोर्ट करणारी ‘मिस्ट्री गर्ल’ निघाली अभिनेत्री, फोटोंवरुन हटणार नाही नजर!!

पृथ्वी शॉने केकेआरला धू धू धुतले; कर्णधार श्रेयस अय्यरही म्हणे, ‘त्यावेळी काय करावे समजत नव्हते’

लखनऊच्या ‘त्या’ घातक फलंदाजांना बाद करण्यासाठी चहलने लढवलेली शक्कल, स्वत:च केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---