ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाची कमान सांभाळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या कसोटीसाठी रोहितला प्लेइंग 11 मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हिटमॅनला अशाप्रकारे वगळण्यात आल्यानं रिषभ पंतला खूप वाईट वाटत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पंतनं रोहितबाबत भावनिक वक्तव्य केलं.
सामन्याच्या एक दिवस आधी रोहितनं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टीम मॅनेजमेंटला कळवलं होतं की, तो पाचव्या कसोटीत खेळणार नाही. रोहितनं त्याचा सध्याचा फॉर्म लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेतला. रोहितच्या या निर्णयाचं अनेक माजी क्रिकेटपटूंनीही कौतुक केलं आहे.
पहिल्या दिवसअखेर झालेल्या पत्रकार परिषदेत पंतला रोहितला वगळण्याचा निर्णय कसा वाटला? असं विचारलं असता, तो म्हणाला, “हा एक भावनिक निर्णय होता. आम्ही त्याला लीडर म्हणून पाहतो. पण कधी कधी असे काही निर्णय घेतले जातात ज्यात तुमचा सहभाग नसतो. याबाबत मी यापेक्षा अधिक काही सांगू शकत नाही.”
या मालिकेत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये रोहितची बॅट पूर्णपणे शांत होती. त्यानं 5 डावात मिळून केवळ 31 धावा केल्या. रोहितला फलंदाज आणि कर्णधार म्हणूनही सतत टीकेला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे संघ व्यवस्थापनाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला. पत्रकार परिषदेत रिषभ पंतनं त्याच्या फलंदाजीबद्दल सांगितलं की त्यानं संयमानं फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. खेळपट्टीवर गोलंदाजांना खूप मदत होती. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना सामना जिंकण्याची 50-50 टक्के शक्यता आहे.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराहवर कामाचा ताण वाढतोय, मालिकेत आतापर्यंत टाकले इतके चेंडू; आकडा धक्कादायक!
स्कॉट बोलँडनं मोडला 50 वर्ष जुना विक्रम! अशी कामगिरी करणारा सर्वात वयस्कर गोलंदाज
रोहित शर्माला बसणार आणखी एक धक्का! कसोटी पाठोपाठ वनडेचंही कर्णधारपद जाणार?