---Advertisement---

हे पोरगं गजब आहे! पंतचे चक्क इंग्लंडकडून यष्टीरक्षण; समालोचक म्हणे, ‘उभ्या आयुष्यात असं पाहिलं नाही’

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 11:14 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तो मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या मजेदार कृत्यांमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहतो. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात लॉर्ड्स कसोटीतील थरारक लढत झाल्यानंतर उभय संघ येत्या तिसऱ्या सामन्याच्या तयारीला लागले आहे. २५ ऑगस्टपासून लीड्स येथे हा सामना सुरू होणार आहे. तत्पूर्वी रिषभ पंतशी संबंधित एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे, ज्यात तो चक्क इंग्लंडच्या खेळाडूंसोबत सराव करताना दिसत आहे.

एखादा खेळाडू इतर संघाच्या खेळाडूंसोबत सरावात गुंतलेला असतो हे क्वचितच दिसून येते. हा व्हिडिओ पाहिल्यावर समालोचक मायकल वॉन म्हणाले की, “मी माझ्या आयुष्यात अशी गोष्ट कधीच पाहिलेली नाही. मैदानावर क्षेत्ररक्षणाचा सराव चालू आहे, जिथे इंग्लंडचे प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूड फलंदाजी करत आहेत आणि पंत त्यांच्या मागे ग्लोव्ह्ज घालून उभा आहे.”

व्हिडिओत दिसते की, रिषभ पंत यष्टीरक्षण करत आहे. इंग्लंडचा खेळाडू जॉनी बेअरस्टो स्लिपवर उभा आहे आणि हसीब हमीद गल्लीत क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे. त्यांच्यासोबक रॉरी बर्न्सही दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे, रिषभ पंत इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये खूप मिसळलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो इंग्लंडच्या खेळाडूंशी संवाद साधतानाही दिसतोय. हा व्हिडिओ लॉर्ड्स कसोटी सामन्यापूर्वीचा आहे.

रिषभ पंतला पाहून समालोचक मायकल वॉन पुढे म्हणाले की, कदाचित त्याला इंग्लंडच्या खेळाडूंसोबत राहण्याची इच्छा असेल, जेणेकरून इंग्लंडचे फलंदाज चेंडूला कसे हिट करताता हे त्याला पाहायचे असेल.

Rishabh Pant Practice with England Team | Exclusive Video | Eng vs Ind 4th Test 2021

 

लॉर्ड्स कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला कसोटी सामना हा अनिर्णित राहिला होता. दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून लीड्स मैदानावर खेळला जाईल. या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात मोठे बदल झाले आहेत. लॉर्ड्स कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळलेला हसीब हमीद आता रॉरी बर्न्ससोबत सलामीला दिसणार आहे. त्याचबरोबर जगातील प्रथम क्रमांकाचा टी20 फलंदाज डेविड मलानला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हे पाहा…! मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती, मांडला व्हॉलीबॉलचा डाव

लॉर्ड्स कसोटीचा वचपा काढण्यासाठी जो रूटची तयारी, ‘या’ नव्या रणनितीसह उतरणार मैदानात!

अँडरसनच्या नाराजीचे कारण आले समोर; ‘या’ क्षुल्लक गोष्टीमुळे बुमराहवर झाला होता नाराज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---