---Advertisement---

आग लगे बस्ती मैं, हम हमारी मस्ती मैं! रिषभ पंतचे बाउंड्रीवर चिल करतानाचे फोटो तुफान व्हायरल

On: बुधवार, फेब्रुवारी 9, 2022 11:08 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात झालेला दुसरा वनडे सामना (Second ODI) भारताने ४४ धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाने नवा प्रयोग केला होता. कर्णधार रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याने या सामन्यात नवी सलामी जोडी उतरवली होती. उपकर्णधार आणि सलामीवीर केएल राहुल याने या सामन्यातून संघात पुनरागमन केले असतानाही यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) याला सलामीला (Rishabh Pant On Opening) पाठवले होते.

परंतु भारतीय संघाचा हा प्रयत्न फसला आणि पंत स्वस्तात बाद होऊन पव्हेलियनला परतला. मात्र पव्हेलियनला गेल्यानंतर त्याने असे काही केले, ज्याने सामना दर्शकांचे प्रचंड लक्ष वेधले आहे. 

तर झाले असे की, आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जाणारा पंत या सामन्यात वरच्या फळीत फलंदाजीला आला होता. त्याने रोहितसोबत मिळून भारताकडून डावाची सुरुवात केली. परंतु वैयक्तिक ५ धावांवर रोहित झेलबाद झाला. त्यानंतर १८ धावा करत पंतही ओडेन स्मिथच्या गोलंदाजीवर जेसन होल्डरच्या हाती झेल देत तंबूत परतला.

स्वस्तात विकेट गमावल्यानंतर पंत ड्रेसिंग रूममध्ये तोंड पाडून बसेल असे वाटत होते. कारण पंतपाठोपाठ त्याच षटकात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीही १८ धावांवर बाद झाला होता. परंतु मैदानाबाहेर काही वेगळेच चित्र दिसले.

https://twitter.com/AbdullahNeaz/status/1491344978140069895?s=20&t=VJHK5wywuNoIgDWsGJtQTg

https://twitter.com/cricketgamee62/status/1491344682710073346?s=20&t=clIWt83HEQe5fFMth9DYMg

https://twitter.com/VedantSharma_/status/1491344448462020609?s=20&t=twADYh8JNJSa0nF-wmEhEg

पंत बाद होऊन माघारी परतल्यानंतर भारतीय संघाच्या वॉटरबॉयसोबत बाउंड्री लाईनपलीकडे आरामात आडवा (Rishabh Pant Chilling At Boundary) पडल्याचा दिसला. यावेळी त्याच्यासोबत या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग नसलेला दिपक चाहरही बसून होता. इतक्या आरामात मैदानाबाहेर चिल करत असलेल्या पंतला पाहून चाहत्यांना भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आठवला. यापूर्वी चहलही असाच बाउंड्री लाईनवर आडवा पडून सामना पाहताना दिसला होता. पंतचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

दरम्यान, पंत या सामन्यात सलामीला येण्यामागचे कारण म्हणजे, २०२३ विश्वचषकापूर्वी भारतीय संघात आवश्यक बदल सुरूच राहतील, असे कर्णधार रोहित शर्माने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पंतला सलामीला पाठवणे हा याच प्रयोगांपैकी एक प्रयोग असल्याचे मानले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रसिद्धचा घातक स्पेल आणि सूर्यकुमारचे झुंजार अर्धशतक, ४४ धावांनी दुसरी वनडे जिंकत मालिकाही भारताच्या खिशात

वनडे क्रमवारी: टॉप-३ मध्ये विराटच्या जवळ पोहोचला रोहित, पण आझमची दशहत अजूनही कायम

भारत वि. वेस्ट इंडिज वनडे मालिकेसंदर्भात माजी भारतीय क्रिकेटरची भविष्यवाणी; ‘रोहितसेना २-१ने सीरिज…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---