दक्षिण आफ्रिका आणि भारत (SAvIND) यांच्यादरम्यान केपटाऊन येथे कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची दोन अनुभवी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली व यष्टीरक्षक रिषभ पंत (Virat Kohli and Rishabh Pant Partnership) यांनी शानदार भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. कमालीचा संयम दाखवत रिषभ पंतने एक लाजवाब खेळी केली. यादरम्यान त्याने दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज मार्को जेन्सनने (Marco Jansen) स्लेज केल्यावर तितकेच ताबडतोब उत्तर दिले.
अशी घडली घटना
सामन्याचा तिसरा दिवस सुरू होताच भारतीय संघाला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या रूपात दोन जबर धक्के बसले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व यष्टीरक्षक रिषभ पंत ही जोडी जमली. दोघांनी पहिल्या सत्रातील सुरुवातीची षटके सावधगिरीने खेळून काढली. त्यानंतर दोघांनी यथेच्छ धावा काढल्या. पहिल्या सत्राच्या अखेरीस पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपले पहिले कसोटी अर्धशतक साजरे केले.
https://twitter.com/shitpostest/status/1481594505837314050?s=21
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला कर्णधार विराट कोहली बाद झाला. त्याने, २९ धावा केल्या. मात्र, दुसऱ्या बाजूने पंतने धावांचा ओघ कायम राखला. त्याचवेळी भारताच्या डावातील ५० वे षटक सुरू असताना दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज मार्को जेन्सन गोलंदाजी करत होता. त्या षटकातील अखेरचा चेंडू त्याने ब्लॅक होल पद्धतीचा टाकला. स्ट्राइकवर असलेल्या पंतने तो चेंडू सरळ त्याच्या दिशेने मारला. जेन्सनने क्षणाचाही विलंब न लावता तो चेंडू पुन्हा एकदा पंतच्या दिशेने फेकला. परंतु, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या पंतने पुन्हा त्या चेंडूवर स्ट्रेट ड्राईव्ह खेळला. ज्यामुळे तो शानदार फॉर्ममध्ये असल्याचे संकेत मिळाले.
https://twitter.com/EM_VATA/status/1481593719363371008?t=CbXxwXcQ7JziXFc7Sh_2NA&s=19
Rishabh Pant To Haters ! 😏🔥#RishabhPant #SAvsIND pic.twitter.com/1tHYy8lGIU
— Abhiram R K (@abhiram2121) January 13, 2022
भारतीय संघ सामन्यात आघाडीवर
पहिल्या डावात नाममात्र आघाडी मिळाल्यानंतर भारताने दुसर्या डावात केएल राहुल, मयंक अगरवाल, अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा हे पहिले चार गडी केवळ ५८ धावांमध्ये गमावले. मात्र, त्यानंतर कर्णधार विराट कोहली पंतने ९४ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या वेळापत्रकात झाला बदल, जाणून घ्या कारण (mahasports.in)