पुणे कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात रिषभ पंत खातं न उघडता धावबाद झाला. झालं असं की, 23व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीनं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं एक शॉट खेळला आणि झटपट धाव घेतली. कोहलीला धावताना पाहून नॉन-स्ट्रायकर एंडवर उपस्थित असलेला पंतही रन घेण्यासाठी धावला. पंत धावणार होता, तेव्हा तो थोडा वेळ संकोचला. पण दुसऱ्या टोकाकडून कोहली वेगानं धावला होता. त्यानंतर पंतनंही धावण्यास सुरुवात केली.
परंतु पंत योग्य वेळी क्रीजमध्ये पोहोचू शकला नाही. पंतनं डायव्हही मारला पण त्याची बॅट क्रीज लाइनच्या आत जाऊ शकली नाही आणि त्याला धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये जावं लागलं. आऊट झाल्यानंतर पंत खूपच निराश दिसला. पंतच्या विकेटमुळे विराट कोहलीसह मैदानावरील चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
दुसरीकडे, सोशल मीडियावर चाहत्यांनी या रनआऊटवर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चाहते यावरून दोन गटात विभागले गेले आहेत. काही चाहते कोहलीला जबाबदार धरत आहे, तर काही जण पंतला दोष देत आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करून आपलं मत व्यक्त केलं.
विराट कोहलीबद्दल बोलायचं झाल्यास, त्याला दुसऱ्या डावातही मोठी धावसंख्या करता आली नाही. तो 17 धावा करून बाद झाला. सँटनरनं विराटला त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. विराट पहिल्या डावातही अवघी 1 धाव करून बाद झाला होता.
पुणे कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताला 359 धावांचे लक्ष्य दिलं आहे. परंतु भारतीय फलंदाज पुन्हा एकदा किवी फिरकीपटूंसमोर गुडघे टेकताना दिसले. सँटनरनं आपल्या अप्रतिम गोलंदाजीनं भारतीय फलंदाजांना हैराण केलं आहे. विशेश म्हणजे, तो पहिल्यांदाच भारतात कसोटी सामन्यात 10 पेक्षा जास्त विकेट घेण्यास यशस्वी झाला आहे.
हेही वाचा –
यशस्वी जयस्वालने मोडला 45 वर्षे जुना रेकॉर्ड, याबाबतीत कोहलीसह दिग्गजांना टाकले मागे
पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, या विक्रमाबद्दल तुम्हीही जाणून घ्या!
रवींद्र जडेजानं रनआऊट करताना दाखवली ‘धोनी’ सारखी हुशारी, कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO पाहा