आयपीएल 2025 साठी बहुतेक संघांनी आपले कर्णधार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता लखनऊ सुपर जायंट्सचं कर्णधारपद यष्टीरक्षक रिषभ पंतला मिळणार हे जवळजवळ निश्चित झालंय. मेगा लिलावात पंतला लखनऊनं तब्बल 27 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. अशाप्रकारे तो इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनला.
केएल राहुलनं गेल्या 3 हंगामात एलएसजीचं नेतृत्व केलं होतं. तो आता दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे. लखनऊ सुपर जायंट्सनं 2022 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होतं. त्यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखाली संघ सलग दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचला. पण आयपीएल 2024 मध्ये संघाच्या खराब कामगिरीनंतर एलएसजीनं राहुलला रिलिज केलं.
आता ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या एका अहवालानुसार, पंतचं कर्णधार होणं जवळजवळ निश्चित आहे. लवकरच याची घोषणा होऊ शकते. रिषभ पंत यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करत होता. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली गेल्या वर्षी सहाव्या स्थानावर राहिली होती. आता जर रिषभ कर्णधार बनला, तर तो डेव्हिड मिलर, निकोलस पूरन, मिशेल मार्श आणि एडन मार्करम यांसारख्या बड्या खेळाडूंचं नेतृत्व करेल.
मेगा लिलावानंतर पूरन, मिशेल मार्श, डेव्हिड मिलर आणि अगदी मार्करम यांच्याकडे कर्णधारपदाचा पर्याय म्हणून पाहिलं जात होतं. लिलावापूर्वी लखनऊ संघानं निकोलस पूरन, आयुष बदोनी, रवी बिश्नोई, मयंक यादव आणि मोहसिन खान यांना रिटेन करण्याचा निर्णय घेतला होता. जर रिषभ पंत कर्णधार झाला तर तो प्रशिक्षक जस्टिन लँगरसोबत काम करेल. तर आयपीएल 2025 साठी लखनऊनं माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला नवीन मेंटॉर म्हणून नियुक्त केलं आहे.
हेही वाचा –
चक दे इंडिया! भारताची खो-खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये एंट्री, चॅम्पियन बनण्यापासून केवळ एक पाऊल दूर
Champions Trophy; बुमराह, हार्दिक असताना शुबमन गिल उपकर्णधार का?
जसप्रीत बुमराहचे चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणे नाही निश्चित! रोहित शर्माचे मोठे वक्तव्य