---Advertisement---

Video: ‘कुणाला तरी राग येतोय’ म्हणत पंतने काढली खोड, रागाच्या भरात पठ्ठ्या सरळ झेलबाद

On: गुरूवार, मार्च 4, 2021 7:50 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात चालू असलेली कसोटी मालिका आता अंतिम चरणात आली आहे. मालिकेतील पहिले ३ कसोटी सामने संपल्यानंतर दोन्ही संघ अहमदाबाद येथे शेवटचा चौथा कसोटी सामना खेळत आहेत. गुरुवारपासून (०४ मार्च) सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर भारत १ बाद २४ धावांवर आहे. तत्पुर्वी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २०५ धावा केल्या होत्या. दरम्यान आपल्या मस्तीखोर स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रिषभ पंतने आपल्या कृत्याने सर्वांचे लक्ष वेधले.

त्याचे झाले असे की, इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्राउले फलंदाजी करत होता. भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल त्याचे पहिले आणि डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याने षटकातील पहिला चेंडू टाकल्यानंतर पंत यष्टीमागून क्राउलेची खोड काढली. ‘कोणाला तरी राग येतोय अक्षर, कोणाला तरी राग येतोय,’ असे म्हणत तो क्राउलेला चिडवू लागला.

यावेळी क्राउलेने शांतपणे पंतची स्लेजिंग ऐकून घेतली खरी, परंतु आतून मात्र तो खूप चिडल्यासारखा दिसला. शब्दांनी नव्हे तर थेट आपल्या फलंदाजीने त्याला उत्तर द्यावे, या उद्देशाने क्राउले सावध झाला. त्याने अक्षरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार खेचण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने चेंडू सरळ मोहम्मद सिराजच्या हाती गेला आणि क्राउले ९ धावांवर झेलबाद झाला.

यावेळचा व्हिडिओ क्रिकेटप्रेमींना खूपच पसंत पडला आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओने धूमाकुळ घातला आहे.

https://twitter.com/teamindia2_0/status/1367338676099837952?s=20

इंग्लंडचा पहिला डाव २१० धावांच्या आतच आटोपला

दरम्यान सामन्याचा विचार करायचा झाल्यास, इंग्लंडला पहिल्या डावात ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या आहेत. इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. तसेच डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स, मोहम्मद सिराजने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तो’ मैदानावर येताच सिराजला मिळाली विकेट, बघा कोण आहे ‘मिया भाई’चा लकीचार्म

‘बेन स्टोक्सने मला शिवी दिल्याचे विराटला सांगितले, मग त्याने पुढे सर्व सांभाळले’, सिराजचा खुलासा

पोलार्डने सहा षटकरांच्या विक्रमाची बरोबरी केल्यावर युवराजने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---