---Advertisement---

नादच खुळा! इंग्लिश गोलंदाजाच्या चेंडूवर रिषभचा एका हाताने सिक्सर, पाहा झक्कास व्हिडिओ

---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला त्याच्या जबरदस्त फटकेबाजी करण्याच्या शैलीसाठी ओळखले जाते. रविवार रोजी (२८ मार्च) पुणे येथे झालेल्या अटीतटीच्या तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने इंग्लंडला चोप चोपले. आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतरही त्याने बचावात्मक खेळी न करता गियर बदलला आणि चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. दरम्यान त्याने एकहाती मारलेल्या षटकाराने सर्वांनाच अचंबित केले.

इंग्लंडचा नवोदित गोलंदाज लियाम लिविंगस्टोन डावातील २७ वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर पंतने एका हाताने डाव्या बाजूला खणखणीत शॉट मारला. त्याने मारलेला चेंडू सरळ सीमारेषेबाहेर जाऊन पडला.

रिव्हर्स स्वीप, गुडघ्यावर बसून अनोखा शॉट यानंतर पंतचा चक्क एकहाती षटकार पाहून चाहते अवाक् झाले आहेत. सोशल मीडियावर त्याच्या या शानदार शॉटची चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

https://twitter.com/sbotopin/status/1376112530943213568?s=20

https://twitter.com/the_indianstuff/status/1376112424437211142?s=20

https://twitter.com/ChhabraKkc/status/1376111749212991491?s=20

https://twitter.com/man4_cricket/status/1376112013361868810?s=20

अखेर ३६ व्या षटकात पंतच्या विस्फोटक खेळीवर पूर्णविराम लागला. ३५.६ चेंडूत सॅम करनने कर्णधार जोस बटलरच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यामुळे ६२ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ७८ धावा करत पंत पव्हेलियनला परतला. मात्र या अफलातून खेळीसह त्याने आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध करुन दाखवले आहे.

पंतला पहिल्या वनडे सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर पंतला संघात स्थान देण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

असं कोण मारतं भावा! गुडघ्यावर बसत रिषभचा ‘३६० डिग्री षटकार’, पाहून विस्फारतील तुमचेही डोळे

स्टेडियममध्ये सामना पाहण्याची संधी मिळेना, पुणेकर चाहत्यांनी टीम इंडियाला सपोर्ट करायला शोधली अजब आयडिया

विराट कोहली परत एकदा टॉस हरल्यावर कर्णधार जोश बटलरच्या चेहऱ्यावरील हसू होतं पाहण्यासारखं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---