---Advertisement---

आयपीएल २०१९: रिषभ पंतने संगकाराला मागे टाकत केला मोठा कारनामा

On: मंगळवार, एप्रिल 30, 2019 2:30 PM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने रविवारी(28 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध खेळताना एक खास विक्रम केला आहे. या सामन्यात त्याने यष्टीमागे 2 झेल घेतले. याबरोबरच आयपीएल 2019 मध्ये यष्टीमागील 20 विकेट्सही पूर्ण केल्या. पंतने आयपीएल 2019मध्ये यष्टीमागे आत्तापर्यंत 15 झेल आणि 5 यष्टीचीत केले आहेत.

यामुळे तो एका आयपीएल मोसमात तसेच एका ट्वेंटी20 क्रिकेट मालिकेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणारा यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने हा विक्रम करताना श्रीलंकेचा दिग्गज यष्टीरक्षक कुमार संगकाराला मागे टाकले आहे.

संगकाराने डेक्कन चार्जर्स संघाकडून आयपीएल 2011 मध्ये खेळताना यष्टीमागे 19 विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये त्याच्या 17 झेल आणि 2 यष्टीचीतचा समावेश होता. त्याचबरोबर यावर्षीच्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ढाका डायनामाईट्सकडून नुरुल हसननेही यष्टीमागे 19 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यामुळे याआधी एका ट्वेंटी20 क्रिकेट मालिकेत यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम संगकारा आणि हसनच्या नावावर होता. पण पंतने रविवारी बेंगलोरच्या हेन्री क्लासेन आणि गुरकिरत मन सिंगचे झेल घेत हा विक्रम आपल्या नावावर केला.

रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेेंजर्स बेंगलोर संघात झालेल्या सामन्यात पंतने यष्टीरक्षणात जरी चांगली कामगिरी केली असली तरी मात्र त्याला फलंदाजीत खास काही करता आले नाही. तो 7 चेंडूत 7 धावा करुन बाद झाला.

पण या सामन्यात दिल्लीने शिखर धवन(50) आणि कर्णधार श्रेयस अय्यरने(52) केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 187 धावा केल्या होत्या.

मात्र त्यानंतर 188 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बेंगलोरला 20 षटकात 7 बाद 171 धावाच करता आल्या. त्यामुळे बेंगलोरला 16 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडला मोठा धक्का, विश्वचषकातून हा खेळाडू झाला बाहेर

रिषभ पंतची विकेटकिपिंगमध्ये कमाल, घेतले हे दोन अफलातून झेल, पहा व्हिडिओ

कोलकता विरुद्ध मैदानात पाऊल ठेवताच रोहित शर्माच्या नावावर झाला हा खास विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment