---Advertisement---

चेंडू बघा, शॉट मारा; धुव्वाधार शतकानंतर रिषभने सांगितली आपल्या फलंदाजीची विशेषता

On: शनिवार, मार्च 6, 2021 10:40 AM
---Advertisement---

भारताच्या गोलंदाजी विभागाच्या दमदार कामगिरीमुळे प्रतिस्पर्धी इंग्लंडचा चौथ्या कसोटीतील पहिला डाव अवघ्या २०५ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या. मात्र यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने षटकार-चौकारांची आतषबाजी दाखवत इंग्लंडची त्रेधातिरपीट उडवली. त्याच्या शतकामुळे भारत पुन्हा मजबूत स्थितीत आला. यानंतर पंतने आपल्या फलंदाजी शैलीचे रहस्य सांगितले आहे.

पंतने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत ११८ चेंडूत १०१ धावा चोपल्या. यात त्याच्या २ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. यादरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसनच्या एका चेंडूवर त्याने लक्षवेधी रिव्हर्स स्वीप मारला होता.

याविषयी बोलताना तो म्हणाला की, “रिव्हर्स स्वीप मारताना, तुम्हाला आधी विचार करावा लागतो. पण जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने होत असतात, तेव्हा ते होते. मला खेळाचे आकलन झाल्यानंतर बऱ्याचदा माझे शॉट खेळण्याचे लायसन्स मला मिळते. प्रेक्षकांचे मनोरंजन होत असेल, तर मी आनंदी आहे.”

“जर गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर त्याचा सन्मान करावा. त्याच्या गोलंदाजीवर एक-एक धाव घेत मोठी आकडी खेळी करावी हेच माझ्या डोक्यात होते. मी नेहमी सामन्याची स्थिती पाहून वाटचाल करत असतो आणि चेंडू पाहून त्यानुसार शॉट मारत असतो. हीच माझ्या फलंदाजीची विशेषता आहे. जेव्हा मी रोहित शर्मासोबत फलंदाजीसाठी मैदानावर उतरलो, तेव्हा चांगली भागिदारी रचण्याची आमची योजना होती. माझ्या डोक्यात फक्त हीच गोष्ट होती की, खेळपट्टीला पाहून आपला योग्य तो शॉट खेळायचा,” असे शेवटी बोलताना पंतने सांगितले.

रिषभ पंतच्या यावर्षी कसोटीत ५०० पार धावा

रिषभ पंत सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने यावर्षी खेळलेल्या ६ सामन्यात ६४.३७ च्या सरासरीने ५१५ धावा केल्या आहेत. यात तो दोनवेळा नव्वदीत बाद झाला आहे. तर यात एका शतकाचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘तुम्हालाच पाहून खूप गोष्टी शिकलो आहे,’ दिग्गज यष्टीक्षरकाच्या प्रशंसेनंतर पंतची मोठी प्रतिक्रिया

कोहली, सिराजशी झालेल्या शाब्दिक वादाबद्दल बेन स्टोक्सने मांडली बाजू, म्हणाला…

रिषभच्या लक्षणीय खेळीने हिटमॅनला पाडली भुरळ; म्हणाला, “पंत धोनीची जागा घेण्यास पूर्णपणे सज्ज”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---