इंडियन प्रीमियर लीगमध्ये काल (दि. 25 ) 40 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात झाला. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात अखेरच्या चेंडूवर दिल्लीने बाजी बारली. गुजरात टायटन्स संघाचा अवघ्या चार धावांनी पराभव झाला. दिल्लीने दिलेल्या 225 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाला 8 बाद 220 धावा करता आल्या.
दिल्ली कॅपिटल्सच्या 224 धावांमध्ये रिषभ पंतच्या 88 आणि अक्षर पटेलच्या 66 धावांचा समावेश होता. अक्षर पटेलने आक्रमक आणि संघाला गरज असताना 66 धावांची बहुमोल खेळी केली. तर दुसरीकडे रिषभ पंतने पुन्हा एकदा त्याचा क्लास दाखवत 88 धावांची वादळी खेळी केली. यात रिषभ पंतच्या आठ षटकार आणि पाच चौकारांचा समावेश आहे. त्यात रिषभ पंतने सामन्यादरम्यान महेंद्रसिंह धोनीच्या स्टाईलने मारलेला हेलिकॉप्टर शॉट सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. ( Rishabh Pant Turns MS Dhoni As His Helicopter Shot Lands In The Stands Watch Video )
Jaise guru, waise shishya 🚁#DCvGT #TATAIPL #IPLonJioCinema #IPLinHindi pic.twitter.com/wBtuLmlqiv
— JioCinema (@JioCinema) April 24, 2024
अधिक वाचा –
– अखेरच्या चेंडूचा थरार! दिल्लीचा गुजरातवर 4 धावांनी रोमहर्षक विजय, डेव्हिड मिलरची तुफानी खेळी व्यर्थ
– एका सामन्यात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज, मोहित शर्माच्या नावे आयपीएलच्या इतिहासातील लज्जास्पद विक्रम
– 5.4 षटकात 44 धावा अन् 3 विकेट्स… त्यानंतर दिसलं ऋषभ पंतचं रौद्र रुप! गुजरातविरुद्ध दिल्लीनं ठोकल्या 224 धावा