जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या अंतिम सामन्याला हाताच्या बोटांवर मोजण्याइतके दिवस उरले आहेत. हा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना येत्या 7 ते 11 जूनदरम्यान खेळला जाईल. यावेळी भारतीय संघात नियमित यष्टीरक्षक रिषभ पंत दुखापतीमुळे सहभागी होऊ शकणार नाही. याच पार्श्वभूमीवर त्याने एक ट्विट केले आहे.
रिषभ मागील वर्षी 30 डिसेंबर 2022 रोजी एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून ते अनेक शस्त्रक्रिया आणि विविध प्रकारच्या उपचारांतून गेला आहे. सध्या तो पुनरागमनाच्या मार्गावर असून, त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होतेय. त्याची प्रकृती बरी होत असली तरी, यावर्षी तो मैदानावर दिसण्याची शक्यता अजिबात नाही. मागील 5 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या रिषभने यामुळेच एक ट्विट केले. त्याने लिहिले,
‘मी देखील क्रिकेट खेळण्याला मिस करतोय’
पंतचा सध्या बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन कार्यक्रम सुरू आहे. काही प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतला आता कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेची गरज नाही. त्याला सध्या बरे वाटत आहे. त्यामुळे पंत लवकरात लवकर बरा होण्याची आशा वाढली आहे. तरीदेखील यासाठी आणखी काही काळ जावा लागेल.
भारताला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात पंतचा मोठा वाटा होता. यावेळी तो नसल्याने भारतीय संघात केएस भरत व ईशान किशन या दोन यष्टीरक्षकांना संधी मिळाली आहे. आता अंतिम सामन्यात यापैकी कोण मैदानावर दिसणारी याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
(Rishabh Pant Tweet On World Test Championship Said Am Missing Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?