आयपीएलमध्ये पहिल्या फेरीच्या यशस्वी सामन्यांनंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी (4 एप्रिल) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात टायटन्स व दिल्ली कॅपिटल्स असा सामना खेळला गेला. या सामन्यात सर्व चाहत्यांना व खेळाडूंना एक आश्चर्याचा धक्का बसला. दुखापतग्रस्त असलेला भारतीय संघाचा प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज तसेच दिल्लीचा नियमित कर्णधार रिषभ पंत हा अचानक सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित झाला. यानंतर सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली.
Rishabh Pant is here! pic.twitter.com/ftCEHR40uC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 4, 2023
या सामन्यात प्रथम दिल्लीचा संघ फलंदाजी करताना दिसला. सामन्याच्या तिसऱ्या षटकात पंतचे स्टॅन्डमध्ये आगमन झाले. यावेळी तो काठीच्या तसेच आपल्या सुरक्षारक्षकांच्या मदतीने चालताना दिसत होता. त्याने हात हलवून सर्वांचे अभिवादन देखील स्वीकार केले. तो मैदानात उपस्थित झाल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू झाली.
Rishabh Pant 🇮🇳💙 pic.twitter.com/3tKpX77iLn
— Sushant Mehta (@SushantNMehta) April 4, 2023
मागील वर्षी डिसेंबरच्या अखेरीस रुडकी येथे जाताना रिषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो मुंबई येथे उपचार घेत आहे. तसेच, तो क्रिकेटपासूनही दूर आहे. त्याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असून, तो काठीच्या सहाय्याने चालताना देखील दिसतोय. आगामी विश्वचषकापर्यंत तो तंदुरुस्त होण्याची शक्यता वर्तवली जाते. आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये तो दिल्लीच्या डग आऊटमध्ये असावा, अशी इच्छा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी व्यक्त केलेली. यामुळे खेळाडूंचे मनोबल वाढेल असे त्यांनी म्हटलेले.
आयपीएलच्या या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नर तर उपकर्णधार म्हणून अक्षर पटेल यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर रिषभचा बदली खेळाडू म्हणून बंगालचा युवा यष्टीरक्षक अभिषेक पोरेल याचा दिल्ली संघात समावेश केला गेलाय.
(Rishabh Pant watching Delhi vs Gujarat match from stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING । लवकरच श्रेयस अय्यरची मोठी शस्त्रक्रिया, आयपीएलसह महत्वाच्या सामन्यालाही मुकणार
आयपीएल 2023 वर कोरोनाचे सावट! महामारीच्या कचाट्यात अडकला भारतीय दिग्गज