यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत एक उत्तम खेळाडू आहे आणि कालांतराने त्याचा खेळ सुधारेल, असे सांगत पंतला बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत पंतची खराब कामगिरी झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाला एमएस धोनीची उणीव जाणवत आहे का असे विचारले असता ‘पंत एक उत्तम खेळाडू आहे त्याला थोडा वेळ देणे आवश्यक आहे, तो चांगली कामगिरी करेल,’ असे सौरव गांगुली म्हणाले.
‘तो हळूहळू परिपक्व होईल, त्याला वेळ द्यावा लागेल’, असेही गांगुली म्हणाले. बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले. मात्र बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी -20 सामन्यात पंतने 26 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. पण खराब यष्टीरक्षण आणि चुकीच्या डीआरएसच्या निर्णयामुळे बांगलादेशने पहिल्या टी -20 सामन्यामध्ये भारताला हरवले.
दुसऱ्या टी- 20 सामन्यातही पंतकडून काही चूका झाल्या त्याने स्टंपच्या पुढे चेंडू पकडल्यानंतर स्टंपिंग केल्यामुळे तो नोबॉल देण्यात आला होता. पण पंतने यानंतर चांगली कामगिरी करत, धावबाद आणि स्टंपिंग करून स्वत: वरचा दबाव कमी केला.
बंदीमुळे टीम इंडियाकडून खेळत नसलेला पृथ्वी शाॅ खेळणार या संघाकडून
वाचा- 👉https://t.co/e002uAMU07👈#म #मराठी #INDvBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019
रोहित शर्माने चुकून अंपायरलाच शिवी दिली, यापुढे घेणार कॅमेऱ्यासमोर बोलताना काळजी.
वाचा 👉 https://t.co/1k2QlLoAfb 👈 #म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #Rohit— Maha Sports (@Maha_Sports) November 10, 2019