भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा आणि महत्वाचा टी२० सामना शुक्रवारी (दि.१७ जून) राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळण्यात आला. याचे कारण ५ सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अगोदरच २-१ असा आघाडीवर होता. त्यानंतर या ‘करो वा मरो’ च्या सामन्यांत भारताने विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. मात्र भारताचा कर्णधार रिषभ पंत पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्यात अपयशी ठरला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी नेमला गेलेला भारताचा कर्णधार रिषभ पंतच्या बॅट मधुन धावा आल्याच नाहीयेत. ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात मात्र ४० धावा केल्या होत्या. तर चौथ्या सामन्यातही तो १७ धावाच बनवु शकला आहे. मात्र त्याच्या फलंदाजीतील फॉर्म सारखाच त्याला नाणेफेक जिंकण्याचा फॉर्म गवसलेला नाही. त्याने मालिकेतील चारही सामन्यात नाणेफेक जिंकले नाहीये. भारतात सामने होत असल्यामुळे भारताचा कर्णधार रिषभ पंतला नाणे हवेत फेकण्याची संधी मिळते. मात्र तरीही त्याला एकही नाणेफेक जिंकण्यात अपयश आले आहे. त्यामुळे पुढच्या म्हणजेच शेवटच्या सामन्यात नोणेफेक जिंकण्यासाठी मी दुसऱ्या हाताने नाणे हवेत फेकेल, असे रिषभ पंत म्हणला आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ अगोदरच २-१ असा आघाडीवर होता. त्यानंतर या ‘करो वा मरो’ च्या सामन्यांत भारताने विजय मिळवत मालिकेत २-२ अशी बरोबरी केली आहे. तर १९ जुलै २०२२ रोजी बॅंगलोर येथे खेळला जाणार आहे. तर सामना जिंकुन मालिका आपल्या खिशात घालण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
VIDEO। मुंबईचा पठ्ठ्या टी२० ब्लास्टमध्ये घालतोय राडा!, लगावले सलग ४ चेंडुत ४ षटकार
कार्तिकचं पुनरागमन ‘या’ खेळाडूंसाठी ठरणार धोक्याची घंटा
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचा कसोटी क्रिकेटला रामराम!, अचानकच केली निवृत्तीची घोषणा