---Advertisement---

रिषभ पंतकडून झेल सुटला आणि पुकोवस्की आऊट होता-होता वाचला, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, जानेवारी 7, 2021 3:11 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सिडनी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पावसाने मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणले. मात्र पावसानंतर झालेल्या खेळात सर्व क्रिकेट चाहत्यांना उत्तम क्रिकेट बघायची संधी मिळाली. मालिकेत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उत्तम फलंदाजी करत भारतीय संघावर दबाव बनवला आहे. अशातच ऑस्ट्रेलियन फलंदाज विल पुकोवस्कीचा एक झेल घेण्यात रिषभ पंत अयशस्वी ठरला.

वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज डावाच्या 25 व्या षटकात गोलंदाजीसाठी आला असता, त्याने टाकलेल्या एका बाउन्सर चेंडूवर पुकोवस्की फसला व चेंडू हवेत उडाला. पंतने दूर असलेल्या चेंडूकडे धाव घेतली व संपूर्ण प्रयत्न केले. प्रथमदर्शी असे जाणवत होते की झेल उत्तम पणे टिपलेला आहे व अंपायरने देखील पुकोवस्कीला सॉफ्ट सिग्नलमध्ये बाद दिले. मात्र रिव्यू घेतल्यानंतर स्पष्ट झाले की चेंडूचा जमीनीला स्पर्श झालेला आहे. त्यामुळे पुकोवस्कीला नाबाद घोषित करण्यात आले.

दरम्यान पुकोवस्कीने या जीवनदानाचा फायदा घेत आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय डावात अर्धशतक झळकावले. पुकोवस्की पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात 62 धावा करून नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर बाद झाला.

पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 55 षटकात 2 बाद 166 धावा केल्या असून लॅब्यूशाने(67) आणि स्टीव्ह स्मिथ(31) नाबाद खेळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

“मी आयुष्यभर लक्षात ठेवेल”, गांगुलीने आपल्या खास मित्राप्रती व्यक्त केली कृतज्ञता

दहा मिनिटात दोन झेल सोडल्याने रिषभ पंतवर चाहत्यांची आगपाखड, मीम्स व्हायरल

“स्टीव्ह स्मिथ पिंजर्‍यातील वाघ आहे, तो केव्हा ही हल्ला करू शकतो”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---