पुणे: आयएफसीआर रोटरी डिस्ट्रीक्ट 3131 तर्फे आयोजित आयएफसीआर आरपीएल अरबन बॅटल टी 15 स्पर्धेत कोवाई रॉकर्स संघाने हरियाणा आरआडी संघाचा तर रायझींग स्टार कोल्हापुर संघाने मुंबई इलाईट वॉरियर संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
लेजेंन्डस् क्रिकेट अकादमी व पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत सचिन गाडगीळच्या अष्टपैलु कामगिरीच्या बळावर रायझींग स्टार कोल्हापुर संघाने मुंबई इलाईट वॉरियर 81 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. पहिल्यांदा खेळताना रवीराज मायदेवच्या 28, शैलेष भोसलेच्या 32 तर प्रितेश करनावत व सचिन गाडगीळ यांच्या प्रत्येकी 31 धावांच्या बळावर रायझींग स्टार कोल्हापुर संघाने 15 षटकात 5 बाद 204 धावा केल्या.
204 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सचिन गाडगीळच्या अचूक गोलंदाजीपुढे मुंबई इलाईट वॉरियर संघ 15 षटकात 4 बाद 132 धावात गारद झाला. सुनिल बोहराने 32 तर आशिष छापरीयाने 31 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. सचिन गाडगीळने 10 धावात 2 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. 31 धावा व 2 गडी बाद करणारा सचिन गाडगीळ सामनावीर ठरला.
दुस-या सामन्यात वसंत कुमारच्या अषटपैलु कामगिरीच्या जोरावर कोवाई रॉकर्स संघाने हरियाणा आरआडी संघाचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
रायझींग स्टार कोल्हापुर- 15 षटकात 5 बाद 204 धावा(रवीराज मायदेव 28, शैलेष भोसले 32, प्रितेश करनावत 31, सचिन गाडगीळ 31, सत्यजीत पाटील 21, संज सालोखे 15, दाजीबा पाटील 15, अरविंद अगरवाल 2-38, सुनिल खोसला 2-15, राजेश झांबले 1-34) वि.वि मुंबई इलाईट वॉरियर- 15 षटकात 4 बाद 132 धावा(सुनिल बोहरा 32, आशिष छापरीया 31, सचिन गाडगीळ 2-10, संजय सालोखे 1-11, सरगम पलारी 1-20) सामनावीर- सचिन गाडगीळ
रायझींग स्टार कोल्हापुर संघाने 81 धावांनी सामना जिंकला
हरियाणा आरआडी- 15 षटकात 5 बाद 96 धावा(मानिक लुथ्रा नाबाद 33, सचिन बजाज 17, वसंत कुमार 2-0, शौलेश जैन 1-7) पराभूत वि कोवाई रॉकर्स- 10 षटकात 2 बाद 97 धावा(वसंत कुमार नाबाद 32, सुमित प्रसाद 14, मानिक लुथ्रा 2-28) सामनावीर- वसंत कुमार
कोवाई रॉकर्स संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.