---Advertisement---

पतीला पाठिंबा देण्यासाठी रितिका अन् धनश्रीची मुंबई-बेंगलोर सामन्यास हजेरी, डिविलियर्सची पत्नीही कॅमेरात कैद

On: मंगळवार, सप्टेंबर 28, 2021 8:30 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मधील ३९ वा सामना रविवारी (२६ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. आरसीबीने या सामन्यात ५४ धावांनी विजय मिळवला आणि मुंबईला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल. हा सामना पाहण्यासाठी काही क्रिकेटपटूंच्या पत्नी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. यामध्ये युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा, रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि एबी डिविलियर्सची पत्नी डॅनियल डिविलियर्सही स्टेडियममध्ये दिसली. त्यांनी मैदानात उपस्थित राहून त्यांच्या संघांना प्रोत्साहन दिले.

सामना पाहण्यासाठी आलेल्या खेळाडूंच्या या पत्नींनी संघाचे प्रोत्साहन देण्याचे काम तर केलेच, पण सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित राहिल्यामुळे त्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषयही बनल्या. डॅनियल आपल्या मुलांसोबत स्टेडियममध्ये दिसली.

तसेच धनश्रीदेखील पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेडियममध्ये बसली होती.

याव्यतिरिक्त रितिकादेखील निळ्या रंगाचा मास्क परिधान करून आपल्या केसांवरून हात फिरवताना दिसली. हे त्यांचे फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

विराटच्या नेतृत्वातील आरसीबीने मुंबई इडियन्सवर दमदार विजय मिळवला आहे. या सामन्यात आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेलने नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने मुंबई इंडियन्सच्या तीन फलंदाजांना एकापाठोपाठ मैदानाबाहेर धाडले आणि आयपीएल २०२१ मध्ये पहिली हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला. तसेच कर्णधार विराट आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने संघासाठी महत्वाची अर्धशतकी खेळी केली.

आरसीबीच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सामना संपल्यानंतर ‘मॅन ऑफ द मॅच’ निवडले गेले. त्याने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या. तसेच गोलंदाजी करतानाही त्याने कमाल प्रदर्शन केले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि कृणाल पांड्या या दोघांना मॅक्सवेलने बाद करून पव्हेलियनमध्ये पाठवले होते. याव्यतिरिक्त कर्णधार विराटने ४२ चेंडूत ५१ धावा केल्या.

दरम्यान, आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरला आहे. आरसीबीने त्याच्ये गुणतालिकेतील तिसरे स्थान कायम ठेवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
-‘हैदराबाद सोडून चेन्नई संघात जा…’, डेव्हिड वॉर्नरला प्लेइंग ११ मध्ये स्थान न मिळाल्याने संतप्त चाहत्यांच्या प्रतिक्रिया
-हैदराबादविरुद्ध संजूची ८२ धावांची ‘कर्णधार खेळी’; ३ हजारी मनसबदार बनत धोनी, कोहलीच्या क्लबमध्ये सामील
-हॅट्रिक पूर्ण करताच हर्षल मैदानावर सुसाट धावत सुटला, आरसीबीचा ‘विजयी क्षण’ एकदा पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---