---Advertisement---

माझ्या वेतनाबद्दल काय? रोहितची पत्नी रितीकाचा प्रश्न

---Advertisement---

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला भारताच्या कसोटी संघात संधी न मिळाल्याने तो सध्या आपल्या पत्नी रितीकाबरोबर सुट्टीचा आनंद घेत आहे. या दोघांनी त्यांचे सहलीला गेल्याचे फोटोही सोशल मिडियावर शेअर केले होते.

पण आता रोहितने रितीकाचा कामात व्यस्त असतानाचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने लिहिले आहे की, ‘आपल्या व्यवस्थापकाशी लग्न करण्याचा तोटा’

https://www.instagram.com/p/Blx089Vgr1M/?taken-by=rohitsharma45

त्याच्या या पोस्टवर रितीकानेही कमेंट करुन रोहितला ट्रोल केले आहे. तिने त्याला कमेंटमध्ये विचारले आहे की ‘माझ्या वेतनाविषयी काय?’

रितीका लग्नाच्या आधीपासून रोहितची व्यवस्थापक म्हणून काम करते.

रोहितच्या या पोस्टवर भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने ही स्माइलची इमोजीची कमेंट केली आहे. तसेच एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीनेही कमेंट केली आहे.

Photo Courtesy: Instagram/rohitsharma45

याआधीही रोहितच्या एका पोस्टवर युजवेंद्र चहलने ‘रोहित तूला मिय करतोय’ अशी कमेंट केली होती. ज्यावर रितीकाने चहलला ‘ आता रोहित माझा आहे.’ अशी कमेंट करत उत्तर दिले होते. 

रोहितने इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या टी20 मालिकेत तसेच वनडे मालिकेत प्रत्येकी एक शतक केले होते.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

टाॅप ५- इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे ५ भारतीय गोलंदाज

-वाढदिवस विशेष- बर्थडे बाॅय जेम्स अॅंडरसनबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

-खेळात मैत्री नाहीच! आयपीएलमधील मैत्री विसरुन हा खेळाडू आता काढणार भारतीय गोलंदाजांची पिसे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment