भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेआधी मोठा झटका बसला आहे. संघाचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळणार होता, मात्र मालिका सुरू होण्यापूर्वीच त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याने त्याला या मालिकेत खेळता येणार नाही. भारतीय संघाला मायदेशातील ही तीन सामन्यांची टी-20 मालिका 27 जानेवारीपासून खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये खेळला जाणार आहे.
भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळले. रोहितने या मालिकेतील शेवटच्या वनडे सामन्यात शतक देखील ठोकले. पण उभय संघांतील टी-20 मालिकेत रोहित आणि विराट विश्रांतीवर आहेत. अशात मालिकेत भारताच्या कर्णदारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्या (hardik Pantya) संभाळणार आहे. हार्दिक मागच्या काही महिन्यांपासून कर्णधारपदाच्या मुद्यामुळे चर्चेत आहे. संघाचा भविष्यातील टी-20 कर्णधार म्हणून त्याला प्रमुख दावेदार मानले जात आहे. अशात ही आगामी मालिका जिंकून हार्दिक त्याची दावेदारी अधिक भक्कम करू शकतो.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ऑक्टोबर 2022 पासून भारतासाठी एकही सामना खेळला नाहीये. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या या सामन्यातून ऋतुराजने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये ऋतुराज गायकवाडने जुलै 2021 मध्ये शेवटचे सामना खेळला होता. त्यानंतर ऋतुराज या संघातून बाहेरच आहे. दरम्यानच्या काळात त्याला संघात पुनरागमनाच्या संधी मिळाल्या, पण दुखापतीमुळे हे शक्य होऊ शकले नाही. यावेळी देखील ऋतुराजचे चाहते त्याच्या पुनरागमनासाठी वाट पाहत होते, पण ऐन वेळी त्याच्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे संघातून माघार घ्यावी लागली.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड़ (दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ: मिशेल सैंटनर (कर्णधार), फिन एलेन, माइकल ब्रेसवेल, डेन क्लीवर, डेवॉन कॉनवे, शेन डफी, लॉकी फर्ग्यूसन, बेन लिस्टर, डेरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, माइकल रिपन, हेनरी शिपली, ईश सोढी, ब्लेयर टिकनर.
(Rituraj Gaikwad will not play in the T20 series against New Zealand due to injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिराजच्या आधी ‘या’ पाच भारतीयांनी पटकावला नंबर 1 वनडे गोलंदाज बनण्याचा मान, पाहा संपूर्ण यादी
बेन स्टोक्स बनला आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर, मागच्या वर्षभरात केली नेत्रदीपक कामगिरी