---Advertisement---

IPL 2026: राजस्थान रॉयल्सचा नवा कर्णधार जाहीर! यशस्वीकडे दुर्लक्ष, ‘या’ खेळाडूकडे नेतृत्वपद

On: शुक्रवार, फेब्रुवारी 13, 2026 5:20 PM
---Advertisement---

इंडियन प्रिमीयर लीग (आयपीएल) २०२६च्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने नव्या कर्णधाराची शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) घोषणा केली. रियान पराग हा राजस्थानचे येत्या आयपीएल हंगामात नेतृत्व करणार आहे. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जमध्ये गेल्याने फ्रॅंचायजीने २४ वर्षीय फलंदाजावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

राजस्थानकडे रियान व्यतिरिक्त कोणताच चांगला पर्याय उपलब्ध नव्हता. संघाकडे रविंद्र जडेजा आणि यशस्वी जायसवाल आहे, मात्र संघ व्यवस्थापकांनी भविष्याचा विचार करता रियानवर विश्वास दाखवला आहे.

मागील वर्षी जेव्हा सॅमसन दुखापतीमुळे बाहेर होता, तेव्हा रियाननेच कर्णधारपद सांभाळले होते. त्याच्या नेतृत्वात राजस्थान केवळ दोन सामने जिंकले आणि सहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे २०२५च्या आयपीएल गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर राहिले. रियानने मात्र फलंदाजीने उत्तम कामगिरी केली. त्याने १४ सामन्यात ३९३ धावा केल्या. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ९५ धावांची खेळी केली होती.

नव्या कर्णधारासाठी मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी नव्या खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या. अंतिम निर्णयामध्ये रियानच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

रियानने २०१९मध्ये राजस्थानकडून आयपीएल पदार्पण केले होते. यामुळे तो आयपीएलच्या सातही हंगामात राजस्थानकडूनच खेळला. यामध्ये त्याने ८४ सामने खेळले आणि त्यामध्ये १५६६ धावा केल्या. त्यात सात अर्धशतकांचाही समावेश आहे. तसेच तो फिरकी गोलंदाजी करण्यातही उत्तम असून त्याने आयपीएलमध्ये ७ विकेट्सही घेतल्या आहेत.

रियान २०१८च्या १९ वर्षाखालील विजेत्या भारतीय संघाचा भाग राहिला. त्यामध्ये त्याने उत्तम कामगिरी केली असता २०१९च्या आयपीएल हंगामासाठी राजस्थानने त्याला २० लाख रुपयांमध्ये संघात घेतले. त्यावर्षी त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. यामुळे तो त्या आयपीएल हंगामात अर्धशतकी खेळी करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.

आयपीएल २०२४च्या हंगामात रियानने ५७३ धावा केल्या होत्या. त्या हंगामात तो राजस्थानकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश असून त्याने ३३ षटकारदेखील मारले होते. यामुळेच त्याने भारताच्या टी२० आणि वनडे संघात पदार्पण केले होते. २०२५मध्ये राजस्थानने त्ाला १४ कोटीी रुपयांमध्ये रिटेन केले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---