इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ३९वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला होता. या सामन्यात राजस्थानने विजय मिळवला. मात्र, राजस्थानच्या या विजयाबरोबर या सामन्यादरम्यान हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्यात झालेल्या वादाची चर्चा चांगलीच रंगली होती. आता त्या वादाला जवळपास महिना उलटल्यानंतर रियान परागने मौन सोडले आहे.
लीग सामन्यादरम्यान, रियान परागने हर्षल पटेलसोबतच्या मैदानावरील भांडणावर मौन सोडले आणि म्हणाला की, “हर्षल पटेलने २०२१मध्ये मला आरसीबीविरुद्ध बाद केले. मी शांतपणे परत जात असताना त्याने हाताने कृती केली आणि म्हणाला चल इथून निघ,” यापुढे बोलताना रियान म्हणाला की, “मला ते तेव्हा दिसले नाही, पण जेव्हा मी ते रिप्लेमध्ये पाहिले, तेव्हा ते माझ्या मनात बसले. त्यामुळे या आयपीएलमध्ये जेव्हा मी त्याला आऊट केले, तेव्हाही मी तसाच विनोद केला. मी त्याला शिवीगाळ केली नाही आणि काही बोललो नाही. एवढेच झाले.”
“त्यानंतर आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, ‘इकडे ये लहान आहेस, लहानच राहा.’ मग मी त्याला म्हणालो, मी तुला बोललो नाही, मग तू माझ्यासोबत असा का बोलत आहेस,” असे परागने सांगितले. पुढे तो म्हणाला की, “त्यानंतर सिराज देखील माझ्या अंगावर धावून आला.”
https://twitter.com/HiPrsm/status/1533110397703966720
दरम्यान, बंगलोर विरुद्ध राजस्थानमध्ये झालेल्या सामन्यात रियानने अखेरच्या चेंडूवर षटकार लगावत डावाची सांगता केली. त्यानंतर रियान डाव संपल्याने पॅव्हेलियनमध्ये परतत होता. मात्र, परत जात असताना तो अचानक मागे वळला आणि त्यानंतर त्याच्यात आणि हर्षल पटेल यांच्याच शाब्दिक वाद रंगला. या वादाचे कारण नक्की कोण होते, हे स्पष्ट झाले नाही. पण, त्यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसून आले. हा वाद सुरू असताना राजस्थान रॉयल्सच्या एका सपोर्ट स्टाफ सदस्याने या दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. नंतर पराग ड्रेसिंग रुममध्ये निघून गेला होता.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी मुद्दाम सचिनला मारण्याच्या हेतूने धोकादायक गोलंदाजी करत होतो’, १६ वर्षांनंतर अख्तरचा मोठा खुलासा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दम दाखवला, तर ‘या’ भारतीय खेळाडूंची विश्वचषकात जागा फिक्स?
युवीला आठव्या वर्षी बोल्ड करणारा मुशीर मुंबईच्या टीममध्ये आलाय