---Advertisement---

अर्रर्र… रियान परागनं हे काय केलं? युट्युबची सर्च हिस्ट्री झाली व्हायरल पाहा व्हिडीओ

On: मंगळवार, मे 28, 2024 1:24 PM
---Advertisement---

रियान परागनं आयपीएल 2024 मध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली. राजस्थान रॉयल्सच्या मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग या हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. रियान परागनं त्याच्या दमदार कामगिरीने खूप नाव कमवले. परंतु आता तो त्याच्या यूट्यूब इतिहासामुळे चर्चेत आला आहे. यूट्यूबच्या इतिहासानं रियान परागसाठी नवीन वाद निर्माण केला आहे.

एक प्रकारे रियान परागचा पर्दाफाश झाला आहे कारण तो यूट्यूबवर काय सर्च करतो हे सगळ्यांनाच समजलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि सारा अली खान यांची नावे रियानच्या यूट्यूब सर्च हिस्ट्रीवर दिसली. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण हे सगळे अचानक कसे समोर आले? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

 

वास्तविक, रियान पराग एक गेमिंग चॅनल देखील चालवतो. ज्यामध्ये तो लाइव्ह स्ट्रीमिंग करतो. या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान पराग यूट्यूबवर कॉपीराइट फ्री म्युझिक शोधत होता. त्याने सर्च बॉक्सवर क्लिक करताच, त्याच्या सर्च हिस्ट्रीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेसह सारा अली खान यांची नावे दिसतात. आणि त्यापुढे हॉट लिहिलेलं दिसतं.

परागचे नाव काही वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तो त्याच्या सोशल मीडिया पोस्ट आणि मैदानावरील काही विचित्र कृतींमुळे वादात सापडला होता. आयपीएल 2023 चा मागील हंगाम परागसाठी खूप वाईट होता. त्याच्या बॅटमधून एकही धावा येत नसल्याने त्याला खूप ट्रोल केले गेले. त्यानं या हंगामत फलंदाजीमार्फत उत्कृष्ट कामगिरी करुन खूप नाव देखील कमावले. परंतु त्याच्या या वागणुकीमुळे रियान पराग पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल संपले! टीम इंडीया समोर आता एकच ध्येय “मिशन वर्ल्डकप” जाणून घ्या भारतीय संघाचे टी-20 विश्वचषकातील वेळापत्रक

फायनल पराभवानंतर काव्या मारननं दिली प्रतिक्रिया म्हणाली, “तुम्ही सर्वांनी टी20 क्रिकेट…” पाहा व्हिडीओ

बीसीसीआय सचिव जय शाहांची मोठी घोषणा! ग्राउंड्समन आणि पिच क्युरेटर्सना मिळणार 25 लाख रुपये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---