दिल्ली । जागतिक हॉकी फेडेरेशनचे अध्यक्ष डॉक्टर नारिंदर ध्रुव बात्रा यांचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या अनिल खन्ना यांनी माघार घेतली आहे.
३ डिसेंबर रोजी निवडणुकीतून माघार घ्यायची तारीख होती. याच दिवशी खन्ना यांनी माघार घेतल्यामुळे बात्रा यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
१४ डिसेंबर रोजी भारतीय ऑलिम्पिक संघटनेची सर्वसाधारण सभा होणार असून यातच नवीन समितीची निवडणूक होणार आहे.
खन्ना हे भारतीय टेनिस संघटनेचे तीन पैकी एक मानद अध्यक्ष आहेत. त्यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या सदस्यांना पत्र लिहून आपला निर्णय कळवळा आहे.