‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ २०२१ पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होईल. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा अर्ध्यावर स्थगित करावी लागली होती. शुक्रवारी (२६ फेब्रुवारी) आयोजकांनी या स्पर्धेत भाग घेणार्या सर्व संघांची घोषणा केली आहे. यावेळी, ऑस्ट्रेलिया लिजेंड्स संघ यावेळी स्पर्धेत भाग घेणार नाही, त्यामुळे बांगलादेश लिजेंड्स व इंग्लंड लिजेंड्स दोन नवीन संघ यावेळी स्पर्धेत सामील झाले आहेत.
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, टिनो बेस्ट, तिलकरत्ने दिलशान, सनथ जयसूर्या, केविन पीटरसन, मॉन्टी पानेसर, मोहम्मद रफीक, खलील अहमद, मखाया एन्टिनी आणि जॉन्टी रोड्स हे दिग्गज माजी खेळाडू या स्पर्धेत खेळतील. ही स्पर्धा रायपूर येथे ५ ते २१ मार्चदरम्यान होणार आहे.
‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ मध्ये सहभागी होणारे संघ आणि खेळाडू
श्रीलंका लिजेंड्स-
तिलकरत्ने दिलशान (कर्णधार), उपुल थरंगा, चमारा सिल्वा, चिंथाका जयसिंघे, थिलन तुषारा, नुवान कुलसेखरा, रसेल अर्नोल्ड, अजंता मेंडिस, परवीझ महारूफ, सनथ जयसूर्या, मंजुला प्रसाद, मलिंदा वर्नापुरा, धम्मिका प्रसाद, रंगना हेराथ, चमारा कपुगेदरा आणि दुलंजना विजेसिंघे
बांगलादेश लिजेंड्स-
खलीद महमूद (कर्णधार), मोहम्मद शरीफ, मुशफिकुर रहमान, ममून उर रशीद, नफीस इक्बाल, मोहम्मद रफीक, अब्दुर रज्जाक, खलील मशूद, हनन सरकार, जावेद उमर, रजीन सालेह, मेहराब हुसैन, आफताब अहमद आणि आलमगीर कबीर
इंडिया लिजेंड्स-
सचिन तेंदुलकर (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, यूसुफ पठाण, नमन ओझा, जहीर खान, प्रज्ञान ओझा, नोएल डेविड, मुनाफ पटेल, इरफान पठान आणि मनप्रीत गोनी
साऊथ आफ्रिका लिजेंड्स-
जॉन्टी रोड्स (कर्णधार), मोर्ने वैन विक, अल्विरो पीटरसन, निकी बोए, एंड्रयू पुटिक, थंडी शबालाला, लूट्स बॉसमान, लॉयड नॉरिस जोन्स, जेंडर डी ब्रूएन, मोंडे जोंडेकी, गार्नेट क्रुगर, रोजर टेलेमाश, जस्टिन केम्प आणि मखाया एन्टिनी
वेस्ट इंडिज लिजेंड्स-
ब्रायन लारा (कर्णधार), दीनानाथ रामनारायन, ऍडम सॅनफोर्ड, कार्ल हूपर, ड्वेन स्मिथ, रेयान ऑस्टिन, विलियम पर्किंस, महेंद्र नागामूटू, पेड्रो कॉलिन्स, रिडले जेकब्स, नरसिंह डियोनारेन, टीनो बेस्ट आणि सुलेमान बेन
इंग्लंड लिजेंड्स-
केविन पीटरसन (कर्णधार), ओवेश शाह, फिलिप मुस्टार्ड, मॉन्टी पानेसर, निक कॉम्पटन, कबीर अली, उस्मान अफजल, मॅथ्यू होगार्ड, जेम्स टिंडाल, ख्रिस ट्रेमलेट, साजिद महमूद, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस स्कूफील्ड, जोनाथन ट्रॉट आणि रेयान साइडबॉटम
महत्त्वाच्या बातम्या –
‘चांगली क्रिकेट खेळपट्टी म्हणजे काय? तिची व्याख्या काय?’, आर अश्विनने इंग्लिश पत्रकाराला फटकारले
“…आणि मराठी भाषेचा गोडवा कळत गेला” मराठी राजभाषा दिनानिमित्त सचिन तेंडुलकरचं खास ट्विट
‘तो माझ्याजवळ आला होता आणि म्हणाला…’ , सुर्यकुमारने सांगितले रोहितबरोबरची खास आठवण