---Advertisement---

Road Safety World Series: आज रंगणार इंडिया-श्रीलंका लीजेंड्स ‘महामुकाबला’, २०११ विश्वचषकाच्या आठवणी होणार ताज्या

On: रविवार, मार्च 21, 2021 1:45 PM
India Legends
---Advertisement---

रायपूर येथे चालू असलेली रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज २०२१ आता अंतिम चरणात आली आहे. आज (२१ मार्च) इंडिया लीजेंड्स विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स यांच्यात या सीरिजचा अंतिम सामना रंगणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या उपांत्य फेरीत इंडिया लीजेंड्सने वेस्ट इंडिज लीजेंड्सला १२ धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. तर श्रीलंका लीजेंड्सने ८ विकेट्सने दक्षिण आफ्रिका लीजेंड्सवर मात करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

विशेष बाब अशी की, रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा अंतिम सामना क्रिकेट रसिकांना विश्वचषक २०११ ची आठवण करुन देणार आहे. कारण २०११ साली झालेल्या विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका संघात अंतिम सामना झाला होता. हा सामना जिंकत भारताने दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते. यावेळी उभय संघात असलेले बरेचसे खेळाडू रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमधील इंडिया-श्रीलंका लीजेंड्स संघाचा भाग आहेत.

अशात ही रोमहर्षक लढत कोणता संघ जिंकेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कधी, कुठे आणि केव्हा होणार इंडिया लीजेंड्स विरुद्ध श्रीलंका लिजेंड्स अंतिम सामना घ्या जाणून –

१. इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स संघातील अंतिम सामना केव्हा होणार?
– इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स संघातील अंतिम सामना २१ मार्च रोजी खेळला जाणार आहे.

२. इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स संघातील अंतिम सामना कुठे खेळवला जाणार ?
– इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स संघातील अंतिम सामना शहीद विर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर येथे खेळवला जाईल.

३. इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स संघातील अंतिम सामना किती वाजता सुरु होणार ?
– इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स संघातील अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता नाणेफेक होईल.

४. इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स संघातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स संघातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात Colors Cineplex चॅनेलवर पाहता येईल.

५. इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स संघातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
–इंडिया विरुद्ध श्रीलंका लीजेंड्स संघातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन Voot App व Jio TV वर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ – 

इंडिया लीजेंड्स संघ –विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर (कर्णधार), मोहम्मद कैफ, युवराज सिंग, युसुफ पठाण, नमन ओझा (यष्टीरक्षक), इरफान पठाण, मनप्रीत गोनी, विनय कुमार, प्रज्ञान ओझा, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, नोएल डेव्हिड, साईराज बहुतुले, समीर दिघे

श्रीलंका लीजेंड्स संघ – तिलकरत्ने दिलशान (कर्णधार), सनथ जयसूर्या, उपुल थरंगा (यष्टीरक्षक), चिंताक जयसिंगे, चमार सिल्वा, कौशल्या वेरातने, रुसेल अर्नोल्ड, फरवीज महारूफ, नुवान कुलशेकर, धम्मिका प्रसाद, रंगना हेरथ, रोमना कलावा, रोमना कलावा चामारा कापुगेदेरा, मालिंदा वारणापुरा

महत्त्वाच्या बातम्या-

जोस बटलरशी घातलेला वाद कोहलीला महागात पडणार? होऊ शकते ‘ही’ कारवाई

रोहितचा ‘अनोखा’ षटकार पाहून कोहली झाला भलताच खुश, रिऍक्शन पाहून म्हणालं सुपर! 

हार्दिकचे लागोपाठ २ गगनचुंबी षटकार, पत्नी नताशाने ‘अशी’ दिली रिऍक्शन; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---