केविन पीटरसन हा इंग्लंडचा एक दिग्गज क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेकदा चांगल्या खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला आहे. तसेच त्याने १५ आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचे नेतृत्वही केले आहे. आता पुन्हा एकदा तो कर्णधाराच्या भूमीकेत दिसणार आहे.
पुढील महिन्यात ५ एप्रिलपासून ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ सुरु होत आहे. ही स्पर्धा छत्तीसगढ़मधील रायपूर येथे खेळवण्यात येणार आहे. खरंतर ही स्पर्धा मागील वर्षीच पार पडणार होती. पण स्पर्धा सुरु असतानाच कोविडचे संकट कोसळल्याने काही सामन्यांनंतर ही स्पर्धा थांबवण्यात आली.
त्यावेळी इंडिया लीजंड्स, श्रीलंका लीजंड्स, ऑस्ट्रेलिया लीजंड्स, दक्षिण आफ्रिका लीजंड्स आणि वेस्ट इंडिज लिजंड्स या संघांचा समावेश होता. मात्र, आता ऑस्ट्रेलिया संघाने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे या स्पर्धेत बांगलादेश लीजंड्स आणि इंग्लंड लीजंड्स या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे.
पीटरसन यांतील इंग्लंड लीजंड्स संघाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. या संघात मॅथ्यू होगार्ड, ओवेस शाह, मॉन्टी पानेसर, निक क्रॉम्पटन, जोनाथन ट्रॉट, जेम्स ट्रेडवेल अशा खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंडचा हा संघ २६ फेब्रुवारीला रायपूरला पोहचणार आहे.
पुढील महिन्यात होणार स्पर्धेला सुरुवात
ही स्पर्धा ५ ते २१ मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत आधी साखळी फेरीतील सामने होतील. त्यानंतर १७ आणि १८ मार्चला उपांत्य फेरीचे सामने पार पडतील. त्यानंतर रविवारी, २१ फेब्रुवारीला अंतिम सामना होईल.
भारतीय संघात सचिन, युवराजचा समावेश
या सामन्यासाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंडिया लीजंड्स संघात सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहिर खान, पठाण बंधू अशा दिग्गजांचा समावेश आहे.
सामाजिक कारणासाठी स्पर्धेचे आयोजन
भारतासह अनेक देशात क्रिकेट हा लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे या स्पर्धेतून जगभरात रस्ता सुरक्षा जागरुकता पसरवण्याचा उद्देश आहे.
इंग्लंड लीजंड्स संघ –
केविन पीटरसन(कर्णधार), ओवेस शाह, फिलिप मस्टर्ड, मॉन्टी पानेसर, निक कॉम्पटन, कबीर अली, उस्मान अफझल, मॅथ्यू हॉगार्ड, जेम्स टिंडल, ख्रिस ट्रॅमलेट, साजिद महमूद, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस स्कोफील्ड, जॉनथन ट्रॉट, रायन साइडबॉटम.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ साठी इंडिया लिजेंड्स संघाची घोषणा; सचिन तेंडुलकरसह ‘या’ दिग्गजांचा समावेश
आयपीएल २०२१चे मुंबईतील आयोजन धोक्यात? बीसीसीआय करत आहे ‘या’ पर्यायांचा विचार