---Advertisement---

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज: युवराजची अष्टपैलू खेळी, सचिनचे अर्धशतक; इंडिया लिजेंड्सचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय

On: शनिवार, मार्च 13, 2021 10:42 PM
---Advertisement---

रायपूर येथील शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या साखळी सामन्यात इंडिया लिजेंड्सने दक्षिण आफ्रिका लिजेंड्सवर ५६ धावांनी मात केली. या विजयासह इंडिया लिजेंड्सने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागा बनवली. अष्टपैलू कामगिरी करणारा युवराज सिंग सामन्याचा मानकरी ठरला.

इंडिया लिजेंड्सचा धावांचा डोंगर
प्रथम फलंदाजी करताना इंडिया लिजेंड्सच्या डावाची सुरुवात कर्णधार सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी केली. मात्र, सेहवाग या सामन्यात अपयशी ठरला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या सुब्रमण्यम बद्रीनाथने सचिन तेंडुलकरसह भारताचा डाव सावरला. त्याने ४२ धावांची खेळी केली. मांसपेशी ताणल्या गेल्याने तो रिटायर्ड हर्ट झाला.

सचिनने जबाबदारीने खेळ करत ३७ चेंडूंमध्ये ९ चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने ६० धावांची खेळी केली. युसुफ पठाणने देखील १० चेंडू दोन उत्तुंग षटकार व एक चौकार मारत २३ धावांची खेळी साकारली. अखेरीस युवराज सिंग (५२) व मनप्रीत गोनी (१६) यांनी ६३ धावांची नाबाद भागीदारी करत भारतीय संघाला २०४ भावान पर्यंत मजल मारून दिली.

युवराजची फटकेबाजी
‘सिक्सर किंग’ असे बिरुद मिरवणाऱ्या युवराजने क्रिकेटप्रेमींना आपले जुने रूप दाखवले. युवराजने अवघ्या २२ चेंडूंमध्ये सहा षटकार व दोन चौकार ठोकत आक्रमक अर्धशतक पूर्ण केले. त्याने भारतीय डावाचा अठराव्या षटकात डी ब्रुयनच्या षटकातील दुसर्‍या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूत सलग षटकार ठोकले. युवराजने ४६ धावांवर फलंदाजी करत असताना गार्नेट क्रूगरच्या चेंडूवर षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान युवराज सिंगचा स्ट्राईक रेट २३६.३६ होता.

गोलंदाजांची किफायतशीर गोलंदाजी
भारतीय फलंदाजांनी दिलेल्या २०५ धावांच्या आव्हानासमोर दक्षिण आफ्रिका लिजेंड्सला सलामीवीर अँड्र्यू पुटीक (४१) व मॉर्नी वॅन विक (४८) यांनी १०.४ षटकात ८७ धावांची दमदार सलामी दिली. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले.

दक्षिण आफ्रिका लिजेंड्ससाठी कर्णधार जोंटी रोड्सने अखेरपर्यंत नाबाद राहत २२ धावा काढल्या. २० षटकाच्या षटकानंतर दक्षिण आफ्रिका लिजेंड्सने ७ बाद १४८ धावा बनविल्या. भारतीय संघासाठी युसुफ पठाणने सर्वाधिक तीन बळी आपल्या नावे केले. फलंदाजीत कमाल करणाऱ्या युवराजने देखील २ फलंदाज तंबूत धाडले.

या विजयासह इंडिया लिजेंड्स संघ रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या उपांत्य फेरीत धडक मारणारा पहिला संघ बनला.

महत्त्वाच्या बातम्या –

Video : क्रिकेटच्या मैदानात पुन्हा युवराजचे वादळ; सलग चार षटकार ठोकत केले चाहत्यांचे मनोरंजन

कुछ नही बदला यार! सचिनच्या ‘त्या’ स्ट्रेट ड्राईव्हने चाहते हरवले आठवणीत, पाहा व्हिडिओ

मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा केल्याबद्दल टीम इंडियाचे खास सेलिब्रेशन, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---