भारतीय संघाचा माजी सलामीवीर रॉबीन उथप्पा हा सध्या युएई येथे इंटरनॅशनल लीग टी20 स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेत दुबई कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना तो दिसतोय. या स्पर्धेदरम्यान त्याने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने आपले अनेक अनुभव सांगितले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करत असतानाचे काही अनुभव त्याने कथन केले. यादरम्यान त्याने काही खुलासे केले.
उथप्पाने 2021 व 2022 असे दोन हंगाम सीएसकेचे प्रतिनिधित्व केले होते. या दरम्यान त्याला खेळण्याची संधी कमी मिळाली तरी, आपला संघासोबतचा अनुभव हा शानदार होता असे त्याने म्हटले. उथप्पाने एका प्रसारण वाहिनीशी बोलताना म्हटले,
“सीएसकेचा भाग असताना प्रत्येक खेळाडूला एक प्रकारची सुरक्षितता वाटते. खेळाडू अंतिम 11 चा भाग नसला तरी, त्याला आपल्याला संधी मिळेल अशी आशा असतेच. मी चेन्नईचा भाग होण्याआधी 195 सामने खेळलो होतो. पहिल्या 12 सामन्यात मला संधी मिळाली नाही. तरीदेखील मला कुठेही असे असुरक्षित अथवा अन्याय झाल्यासारखे अजिबात वाटले नव्हते. हा संघ सोडण्याची कोणत्याही खेळाडूची इच्छा नसते.”
रॉबीन उथप्पाने मागील वर्षी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली. मात्र त्यानंतर त्याने आपला निर्णय बदलत इंटरनॅशनल लीग टी20 खेळण्याचा निर्णय घेतला. भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेला उथप्पा 2007 टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. तसेच आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्स या संघाचे प्रतिनिधित्व केले. तसेच तो 2014 आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज होता.
(Robbin Uthappa Big Statement On His Stint With CSK)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेटचा सगळ्यात मोठा मॅचविनर टी20त ठरतोय फ्लॉप, करिअर येणार धोक्यात?
सगळं खोटं! ना 50 कोटींचा बंगला, ना महागड्या गाड्या; राहुल-अथियाला लग्नात दमडीही मिळाली नाही