सध्या संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे इंटरनॅशनल लीग टी20 ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा हा दुबई कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतोय. निवृत्तीनंतरही शानदार फॉर्ममध्ये असलेल्या उथप्पाने वनडे क्रिकेटबाबत चिंता व्यक्त करताना, आगामी काळात टी20 व टी10 क्रिकेट अधिक खेळवले पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली.
उथप्पा प्रतिनिधित्व करत असलेला दुबई कॅपिटल्स संघ सध्या या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करतोय. भारताने जिंकलेल्या 2007 टी20 विश्वचषक संघाचा तो सदस्य होता. तसेच, 14 वर्ष त्याने आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी करून दाखवली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो क्रिकेटच्या भविष्याबद्दल म्हणाला,
“वनडे क्रिकेटची लोकप्रियता ढासळली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे टी20 कडे वळलेले दिसते. तसेच भविष्यात टी10 क्रिकेटचा देखील पर्याय आहे. मला वैयक्तिकरित्या तरी असे वाटते की, लवकरच अधिकाधिक टी10 क्रिकेट लीग आपल्याला पाहायला मिळतील.”
अबुधाबी येथे मागील पाच वर्षापासून अबुधाबी टी10 लीग ही स्पर्धा होत असते. 10 षटकांच्या या स्पर्धेत अनेक बडे क्रिकेटपटू खेळताना दिसतात. त्याचबरोबर, सध्या जगभरात अनेक टी20 लीग खेळल्या जातात. भारतात आयपीएल, ऑस्ट्रेलिया बिग बॅश, वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग तसेच पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग अनेक वर्षांपासून खेळली जाते. तसेच, मागील काही वर्षात श्रीलंका व बांगलादेश यांनी देखील आपल्या लीग सुरू केल्या आहेत. तसेच यावर्षीच दक्षिण आफ्रिकेत आणि युएईमध्ये नव्या लीग सुरू झाल्या असून, त्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
(Robin Uthappa said I believe there will be more T10 leagues upcoming)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाह रे विदर्भ! गुजरातविरूद्ध अवघ्या 73 धावांचा बचाव करत रणजी ट्रॉफीत नोंदवला विक्रमी विजय
ऐतिहासिक! रणजी ट्रॉफीत तब्बल 41 वर्षांनी दिल्लीची मुंबईवर मात, फलंदाजांची हाराकिरी नडली