भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पा दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याची पत्नी शीतल उथप्पा हिने एका नवजात मुलीला जन्म दिला आहे. उथप्पाने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नी शीतलचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती गर्भवती दिसत होती.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये केरळ संघासाठी खेळणाऱ्या रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून तो दुसऱ्यांदा वडील झाल्याची माहिती चाहत्यांना कळवली. उथप्पाने जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये त्याच्या हातात नवजात बाळ दिसत आहे. फोटोत शीतल (Shheethal Robin Uthappa) रॉबिन आणि त्यांच्यासह त्यांचा पहिला मुलगा नोलानही (Neal Nolan Uthappa) दिसत आहे. उथप्पा कुटुंबीयांनी त्यांच्या बाळाचे नाव ट्रिनिटी थिया उथप्पा (Trinity Thea UTHAPPA) असे ठेवले आहे.
शीथल उथप्पा एक व्यावसायिक टेनिसपटू राहिली आहे. शीतलने वयाच्या ९ व्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली होती. वयाच्या ३३ व्या वर्षी तिने या खेळातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. रॉबिन उथप्पा आणि शीतलची ओळख सर्वप्रथम कॉलेजमध्ये असताना झाली होती. शीतल उथप्पापेक्षा वयाने मोठी होती. दोघेही क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती, जी पुढे प्रेमात बदलली. ३ मार्च २०१६ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.
https://www.instagram.com/p/Cf–niPh1JP/?utm_source=ig_web_copy_link
भारतीय संघासाठी उथप्पाने आतापर्यंत ४६ वनडे आणि १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने २६ च्या सरासरीने ९३४ धावा केल्या आहेत, तर टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याच्या २४९ धावा आहेत. भारताच्या २००७ सालच्या विश्वचषकविजेत्या संघाचाही तो भाग राहिला आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी १२ सामने खेळले आणि यामध्ये १३४.५० च्या स्ट्राईक रेटने २३० धावा केल्या. यामध्ये त्याच्या दोन अर्धशतकांचाही समावेश होता. आगामी आयपीएल हंगामात चाहते उथप्पाला खेळताना पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआयने पुन्हा तोडली ‘या’ फिरकीपटूंची जोडी; एकाला संघात घेताच दुसऱ्याला ‘विनाकारण’ बसवलं
WIvsIND: आयर्लंडविरुद्धच्या दमदार प्रदर्शनानंतरही संजूकडे दुर्लक्ष, चाहत्यांकडून निवडकर्त्यांवर टीका